Mumbai Rain : मुंबईत परतीच्या पावसाचा हाहाकार, मुंबईकरांसाठी पुढील काही तास महत्वाचे

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbai rain update heavy rain fall mumbai thane and near suburbn area maharashtra rain 2024
मुंबईकरांना परतीच्या पावसाने झोडपले आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

point

मुंबईच्या सखल भागात पाणी साचले

point

मुंबईकरांना पुढील काही तास महत्वाचे

Mumbai Rain Update : मुंबईकरांना परतीच्या पावसाने झोडपले आहे. आज अचानक रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईसह ठाणे आणि सखल भागात हा पाऊस पडला आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. तसेच चाकरमान्याची घर गाठण्यांसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. (mumbai rain update heavy rain fall mumbai thane and near suburbn area maharashtra rain 2024)

ADVERTISEMENT

हवामान विभागाने आज मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे आणि इतर भागांसाठी यलो अलर्ट जारी केला होता. मात्र आज मुंबई आणि ठाणे भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे नवरात्रौत्सवात मोठा व्यत्यत आला आहे. तसेच या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. 'पुढील 3-4 तासांत मुंबईच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे,” असे आयएमडीने म्हटले आहे."विजांच्यां गडगडाटांसह वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस वेगळ्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : Ratan Tata : पारशी समुदायात गिधाडांसाठी ठेवतात मृतदेह, रतन टाटांवर विद्युतदाहिनीत का झाले अंत्यसंस्कार?

मुंबईकरांचे झाले 

अचानक पडलेल्या या पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत. गरबा खेळायला बाहेर पडलेल्या गरबाप्रेमींच्या आनंदावरही विरजण पडले आहे. तसेच अनेक भागात पडलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी देखील साचले आहे. त्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले होते. 

हे वाचलं का?

नागरीकांसाठी धोक्याची घंटा 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह मुंबई पूर्व उपनगरे, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पुढील 120 मिनिटांपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. 

हे ही वाचा : Gold Price: सोनं स्वस्त! वाट कसली बघताय खरेदी करा जबरदस्त

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT