Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना PM मोदींबद्दल असं काय बोलली की लोक करताहेत ट्रोल?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Kangana Ranaut Compared PM Narendra Modi With Lord Rama : लोकसभेची सेमी फायनल म्हणून पाहिल्या गेलेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान या राज्यात भाजपची सत्ता आली आहे. तर काँग्रेसने तेलंगणा राज्य जिंकले आहे. या विजयानंतर भाजपकडून विजयोस्तव साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील ट्विटकरून जनतेचे आभार मानले. यासोबत बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. बॉलिवूडची क्वीन कंगणा रणौत (Kangana Ranaut) हिने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. कंगणाच्या या कौतुकानंतर आता तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. (kangana ranaut bollywood actress compared pm narendra modi with lora rama after bjp won madhya pradesh rajasthan  Chhattisgarh troll in social media)

ADVERTISEMENT

मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान या राज्यातील भाजपच्या विजयानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौत एक ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो शेअर करत ‘राम आए है’ #Electionresult या हॅशटॅग खाली पोस्ट शेअर केली आहे. या ट्विटमध्ये तिने पंतप्रधान मोदींची तुलना भगवान रामाशी केली आहे. कंगणाची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आता तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे.

हे ही वाचा : Katipally Venkat Reddy : माजी आणि भावी मुख्यमंत्र्यांना पाडलं, कोण आहे ‘हा’ भाजपचा ढाण्या वाघ?

कंगनाचे नेटकऱ्यांना प्रत्युत्तर

कंगनाला सोशल मीडियावर ट्रोल केल्यानंतर तिने ट्रोलर्सनाही प्रत्युत्तर दिले आहे. तिच्या पोस्टवर एका नेटकऱ्याने विचारले की, खरंच तू हिंदू देवांसोबत तूलना करत आहे का? हिंदू धर्मामध्ये याची परवानगी आहे का? नेटकऱ्याच्या या प्रश्नाला उत्तर देताना कंगनाने लिहले की, हा याची परवानगी आहे. गीतामध्ये श्रीकृष्णाने सांगितले की, जो माझा भक्त आहे. माझ्यामध्ये लीन आहे. तो मीच आहे. त्याच्यात माझ्यात काही फरक नाही. ऐवढं गोंडस आणि शांत देव आहेत. कोणी आपलं मुंडकं कापणार नाही. तुम्ही पण आमच्या टीममध्ये या.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Assembly elections 2023: काँग्रेसचे टोचले कान, भाजपला चिमटे; शिवसेनेचं UBT म्हणणं काय?

कंगना तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहले की, माझ्या बोलण्याचा इतकाच अर्थ आहे की, अयोध्यामध्ये मोदीजी भगवान रामाला घेऊन आले आहेत. तर आता जनता त्यांना घेऊन आली आहे. पण तुम्हाला जे वाटले ते देखील चुकीचे आहे. कंगनाच्या या ट्विटची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT