Maratha Reservation : मराठा आंदोलनात केतकी चितळेची उडी, व्हिडिओ केला शेअर; म्हणाली…

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ketaki chitale post on maratha reservation manoj jarange patil agitation maratha protest
ketaki chitale post on maratha reservation manoj jarange patil agitation maratha protest
social share
google news

Ketaki chitale post on Maratha Protest, Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात चांगलाच पेटला आहे. या मुद्द्यावरून राज्यभरात मराठा समाजाची आंदोलने, निदर्शने सूरू आहेत. आमदारांची घरे, पक्ष कार्यालये पेटवली जातायत. तसेच आमदार, मंत्र्यांच्या गाड्या फोडल्या व अडवल्या जातायत. एसटी बसची तोडफोडीच्या घटना अनेक जिल्ह्यातून समोर आल्या आहे. एकूणच मराठा समाज आरक्षण घेण्याच्या मागणीवर पेटून उठला. या सर्व घडामोडीवर आता अभिनेत्री केतकी चितळेने (ketaki chitale)  एक पोस्ट लिहली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने मराठा आंदोलकांना अनेक सवाल केले आहे. मात्र तिच्या या भूमिकेवरून तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आले आहे. (ketaki chitale post on maratha reservation manoj jarange patil agitation maratha protest)

अभिनेत्री केतकी चितळेने (ketaki chitale) एसटीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तिने मराठा आंदोलकांना अनेक सवाल केले आहेत. या व्हिडिओत एक तरूण रस्त्यावर धावत असलेल्या एसटीच्या समोर येतो आणि काचेवर दगड मारतो,असे या व्हिडिओ दिसते आहे. या व्हिडिओचा आधार घेऊन, एसटी विभाग आणि चालक आरक्षण कसे देणार ? चुकून दगड चालकाला लागला तर? सरकारकडे मागणी करा, सामान्य माणसाला त्रास देऊन काय होणार? एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? असे सवाल केतकी चितळेने मराठा आंदोलकांनी केले आहेत

हे ही वाचा : Maratha Reservation : आरक्षण आंदोलनात भाजप फसलं? समजून घ्या राजकारण

केतळी चितळेची पोस्ट जशीच्या तशी…

एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?
इंडियाला युनिफॉर्म सिविल कोड हवा असेल (UCC), पण भारताला #Uniformcivillaw तसेच #Uniformcriminallaw ची गरज आहे.
सरकारकडे मागणी करा, सामान्य माणसाला त्रास देऊन काय होणार? आणि एसटी विभाग आणि चालक कसे देणार आरक्षण, चुकून तो दगड चालकाला लागला असता तर?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

!!जय हिंद!!
!!वंदे मातरम !!
!!भारत माता की जय !!

केतकी चितळेच्या या पोस्टवरून आता सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले आहे. अनेकांनी तिच्या या पोस्टवर कमेंट करून तिच्यावर टीका देखील केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Mumbai Crime : मेहंदीवाले केस, कानातले…; महिलेची हत्या करणारा कसा सापडला?

दरम्यान आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा नववा दिवस आहे. काल आठव्या दिवशीच जर सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत ठोस तोडगा न निघाल्यास जलत्याग आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार जरांगेनी जलत्याग आंदोलन सुरु केले आहे.तर आज सरकारचं शिष्ठमंडळ जरांगे पाटलांची भेट घेणार आहेत. या शिष्ठमंडळाकडून जरांगे पाटील यांची समजूत काढण्यात येणार आहे. तसेच सरकारला थोडा वेळ देण्याची विनंती करून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT