मोठी बातमी : शॉर्टसर्किटमुळे अपार्टमेंटला मोठी आग, अभिनेत्रीच्या दोन मुलांचा गुदमरुन मृत्यू

मुंबई तक

Kota Fire incident : राजस्थानातील कोटामधून मोठी दुर्घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोटामध्ये बालकलाकाराचा गुदमरुन मृत्यू

point

अभिनेत्रीच्या दोन मुलांनी गमावला जीव

Kota Fire incident : राजस्थानमधील कोटातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका अपार्टमेंटला लागलेल्या आगीत अभिनेत्रीच्या दोन मुलांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. वीर शर्मा आणि शौर्य शर्मा असं मृत्यू झालेल्या मुलांचं नाव आहे. ही दोन्ही मुलं अभिनेत्री रिटा शर्माची मुलं आहेत. अपार्टमेंटला आग लागल्यानंतर दोन्ही मुलांचा गुदमरुन जीव गेलाय. मृत्यू झालेला वीर हा एक चाइल्ड आर्टिस्टही होता, ज्याने 'वीर हनुमान' मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारली होती. या भीषण दुर्घटनेत वीरचा सख्खा भाऊ शौर्य शर्मा हेदेखील मृत्यूमुखी पडला. मृत्यूमुखी पडलेली दोन्ही मुलं अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. 

दोन्ही मुलं बेशुद्ध अवस्थेत सापडली, दोघांचाही गुदमरुन मृत्यू 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अनंतपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीपश्री मल्टी स्टोरी बिल्डिंगमध्ये घडली. शनिवारी (27 सप्टेंबर) मध्यरात्री सुमारे 2 वाजता दोन्ही मुले घरी एकटीच झोपली होती. पोलीस ठाण्याचे अधिकारी भूपेंद्र सिंह यांनी सांगितले की, बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 403 मध्ये गुदमरुन दोघांचा मृत्यू झालाय. अपार्टमेंटला आग लागली तेव्हा मुलांचे आई-वडील घरी नव्हते. वडील जितेंद्र शर्मा बाहेर गेले होते, तर आई रीटा शर्मा मुंबईत होत्या. रीटा शर्मा स्वतः एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत.  शेजाऱ्यांनी फ्लॅटमधून धुराचे लोट बाहेर येताना पाहिले. त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून मुलांना बाहेर काढले. दोन्ही मुले बेशुद्ध अवस्थेत सापडली आणि तातडीने रुग्णालयात नेण्यात आली. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यू झालेला 10 वर्षीय वीर अभिनेता होता, तर त्याचा भाऊ शौर्य IIT ची तयारी करत होता. ही आग नेमकी कशी लागली? हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Veer (@veersharma_1612)

हेही वाचा : धावत्या लोकलमधून नारळ फेकला, पूलावरुन जात असलेल्या तरुणाच्या डोक्याला लागला; रुग्णालयात पोहोचताच...

रामायण मालिकेत साकारली होती भूमिका 

वीरने श्रीमद रामायण या टीव्ही मालिकेत भरताचा मुलगा पुष्कलची भूमिका केली होती. एवढेच नव्हे, तर एका चित्रपटात त्याला सैफ अली खानच्या बालपणाची भूमिका मिळाली होती, त्यासाठी तो मुंबईला जाणार होता. या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आई-वडिलांनी हंबरडा फोडलाय. 

हे वाचलं का?

    follow whatsapp