Madhuri Dixit : माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढवणार? मुंबई Tak च्या मुलाखतीत स्पष्टच सांगितलं

अजय परचुरे

ADVERTISEMENT

madhuri dixit on loksabha election 2024 politics shriram nene panchak movie release 5 th january bollywood actress
madhuri dixit on loksabha election 2024 politics shriram nene panchak movie release 5 th january bollywood actress
social share
google news

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केली आहे. यासाठी पक्षांनी उमेदवारांची चाचपणी आणि मतदार संघाचा आढावाही सूरू केला आहे. असे असतानाच अनेक बॉलिवूड अभिनेता आणि अभिनेत्री लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा रंगत असचे. सध्या बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. आता ती खरचं लोकसभा निवडणूक लढवणार आहे की ही निव्वळ अफवा आहे? यावर आता तिने मुंबई तकला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत उत्तर दिले आहे. (madhuri dixit on loksabha election 2024 politics shriram nene panchak movie release 5 th january bollywood actress)

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक 2024 लढवणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे.माधुरी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवेल, असे देखील बोलले जात होते. यावर आता माधुरी दीक्षितने स्पष्टच उत्तर दिले आहे. प्रत्येक निवडणुकीला मला यावर उत्तर द्यावे लागते. नाही अजिबात नाही. लोकसभेची निवडणूक लढवण्याची माझी काहीच इच्छा नाही आहे, असे तिने स्पष्ट केले. तसेच मला अभिनय करायला आवडतो. अभिनय क्षेत्र हे माझं पॅशन आहे. राजकारण हे माझ पॅशन नाही,असे देखील माधुरीने यावेळी सांगितले आहे.

हे ही वाचा : Sharad Pawar : “काकांच्या सावलीत वाढलेले अजित पवार…”, आव्हाडांनी इतिहासच काढला

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान माधुरी दीक्षित नेने आणि त्यांचे पती श्रीराम नेने हे पंचक हा मराठी सिनेमा घेऊन आले आहेत. हा सिनेमा येत्या 5 जानेवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

हे ही वाचा : Maharashtra Politics : खैरे-दानवेंनी वाढवला ठाकरेंचा ताण, मातोश्रीवरील बैठकीत काय झालं?

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकरने लोकसभा निवडणुकीवर मोठं भाष्य केले होते. “बघा, खूपच चांगल्या पद्धतीने भाजप येईल. भाजप विरोधात तुमच्याकडे चांगला पर्याय नाही. इतकं चांगलं काम होत आहे की, 350 ते 375 जागांपर्यंत जातील. मला आश्चर्य वाटणार नाही. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील”, असं राजकीय भाकित नाना पाटेकरांनी केलं आहे. नानांच्या या भाकितानंतर आता ते भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेवर आता नाना पाटेकर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT