खासदार सुजय विखे पाटील वाय या मराठी सिनेमाला का देतायत पाठिंबा? फोटो झाला व्हाय़रल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’हा चित्रपट येत्या २४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक जण ‘वाय’ अक्षराचे पोस्टर शेअर करत आहेत. कलाकारांनी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हा फोटो शेअर करत, माझा पाठिंबा आहे ! आपला? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला सर्वसामान्यांनीही पोस्टर शेअर करत सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. आता संसदेचे सदस्य सुजय विखे पाटील यांनीही सोशल मीडियावर ‘वाय’चे पोस्टर शेअर करत आपला पाठिंबा दर्शवला आहे. वाय या सिनेमाचा विषय हा महिलांच्या हक्काविषयी संबधित आहे, स्त्रीभ्रूणहत्येचा प्रश्न महाराष्ट्रात मोठा आहे.. या प्रश्नाला वाचा फोडणारा विषय या सिनेमात आहे. त्यामुळे या सिनेमाला पाठिंबा देत असल्याचं सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता सर्वांनाच उत्कंठा लागून राहिली आहे ती ‘वाय’ नक्की आहे तरी काय, याची. मुक्ता बर्वे हिची प्रमुख भूमिका असलेला, कंट्रोल एन प्रॅाडक्शन निर्मित वास्तवाचा थरार दाखवणारा आणि कल्पनेच्या पलीकडील ‘ती’ च्या लढ्याची गोष्ट सांगणारा ‘वाय’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT