Nana Patekar : ‘चूक झाली माफ करा पण…’, टपली मारलेल्या Video वर पाटेकर अखेर बोलले!
व्हिडिओमागील सत्याबद्दल ‘आजतक’ने चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्याशी संपर्क केला. त्यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, “मला नुकतीच ही बातमी कळली आहे. मी आत्ता तोच व्हिडिओ पाहत होतो. नानांनी कुणाला मारहाण केलेली नाही, तर तो माझ्या चित्रपटातील सीन आहे.”
ADVERTISEMENT

Nana Patekar break silence on viral video : बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडिओत शुटींग दरम्यान सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका तरूणाला नाना पाटेकर यांनी चापट मारल्याचे समोर आले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर नाना पाटेकर यांच्यावर टीका होऊ लागली आहे. या टीकेनंतर आता नाना पाटेकर यांनी स्वत: समोर या येऊन या घटने मागची सत्यता सांगितली आहे. (nana patekar break silence on viral video of him slapping fan on shooting bollywood actor)
व्हिडिओत काय?
व्हिडिओत शुटींग सूरू आहे. सर्व कलाकार दिग्दर्शकाच्या कॉलची वाट पाहतायत. इतक्यात सेल्फीसाठी एक मुलगा जवळ येतो आणि नाना पाटेकर त्याच्या डोक्यात जोरात चापट मारतात. त्यानंतर काही तरी पुटपुटतात. शुटिंग दरम्यान घडलेला हा सर्व प्रकार कुणीतरी कॅमेरात रेकॉर्ड केला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर केला होता. त्यानंतर नाना पाटेकरांवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
हे ही वाचा : Mohammed Shami: तीन वेळा आत्महत्येचा विचार… संघर्षातून असा घडला मोहम्मद शमी!
नाना पाटेकरांकडून व्हिडिओ जारी
सोशल मीडियावर उमटलेल्या संतप्त प्रतिक्रियेनंतर आता नाना पाटेकर यांनी समोर येऊन या घटनेची माहिती दिली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. सिनेमाची शुटींग सुरु होती. सीनमध्ये एक मुलगा माझ्यामागून येणार होता आणि मी त्याला मारणार होतो, असा सीन आम्हाला शुट करायचा होता. याबाबत आमची एक रिहर्सल ही झाली होती. दिग्दर्शक म्हणाले पुन्हा रिहर्सल करूया.
Stars won’t exist without fans….Fans should also avoid taking selfies with these egoistic stars…
What is this #Nanapatekar ji???#Prabhas never did like this in his entire career even after getting PAN Indian stardom with #Baahubali ….#Salaar pic.twitter.com/Mb6dIFkzzw— Tolly hub (@tolly_hub) November 15, 2023