Priyanka Chopra : 'देसी गर्ल'ला मिळालं 'देसी' बर्थडे सरप्राईज, निक जोनसने काय दिलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

priyanka chopra 42nd birthday nick jonas give special suprised send truck dosa on shooting site
निक जोनसने प्रियांकाला (Priyanka Chopra) दिलेल्या बर्थडे सरप्राईजची खूप चर्चा रंगली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रियंका चौप्राने तिचा 42 वा वाढदिवस साजरा केला

point

निक जोनसने प्रियांका चोप्राचा बर्थडे बनवला खूप खास

point

निक जोनसने दिलेल्या बर्थडे सरप्राईजची खूप चर्चा

Priyanka Chopra Birthday : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चौप्राने 18 जुलैला तिचा 42 वा वाढदिवस साजरा केला आहे. यानिमित्त अनेक अभिनेते, अभिनेत्रींनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. प्रियांकाच्या या वाढदिवसाला तिचा पती निक जोनस (Nick jonas)  तिच्यासोबत उपस्थित राहु शकला नाही. मात्र तरी देखील त्याने तिचा वाढदिवस खूप खास बनवला होता. विशेष म्हणजे निक जोनसने प्रियांकाला (Priyanka Chopra) दिलेल्या बर्थडे सरप्राईजची खूप चर्चा रंगली आहे. त्यामुळे नेमकं त्याने काय दिलंय? हे जाणून घेऊयात. (priyanka chopra 42nd birthday nick jonas give special suprised send truck dosa on shooting site) 

ADVERTISEMENT

प्रियांकाच्या या 42 व्या वाढदिवसी ती स्वता: देखील खूप व्यस्त होती. आणि तिचा नवरा निक जोनस देखील तिच्यापासून दुर होता. मात्र निक जोनसने दूर असून देखील त्याने प्रियांका चोप्राला देसी सरप्राईज दिलं आहे. निक जोनसने प्रियांका चोप्रासाठी केक सोबत भेटवस्तू पाठवल्या होत्या, पण या सगळ्यात जास्त लक्ष वेधले ते पार्टीतील मेन्यूने. निक जोनसने प्रियांकाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या टीम आणि क्रूला पार्टी दिली होती. या पार्टीसाठी त्याने  एक डोसा ट्रक पाठवला. जिथे मसाला डोसा ते चीज डोसा पर्यंत डोसाच्या अनेक प्रकारांचा समावेश होता. निक जोनसच्या या देसी सरप्राईजने प्रियांका भारावून गेली होती. 

हे ही वाचा : Pooja Khedkar: पूजा खेडकरांची IAS ची नोकरी जाणार? UPSC कडून गुन्हा दाखल

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांका चोप्राची पोस्ट 

दरम्यान या बर्थडे सरप्राईजनंतर प्रियांकाने सोशल मीडियावर पोस्ट करून निक जोनसचे आभार मानले. प्रियांका पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहते, "या वर्षी मी माझा वाढदिवस कामात घालवला. गेल्या काही वर्षांत मी असे अनेक वाढदिवस साजरे केले आहेत आणि चित्रपटाच्या सेटवर वाढदिवस साजरा करायला मला खूप आवडते. तसेच मी माझ्या नवऱ्याची आभारी आहे, ज्यांनी त्यांची उपस्थिती अशा विशेष प्रकारे अनुभवली, जरी तो येथे नसला तरीही, अशा शब्दात प्रियांकाने निकचे आभार मानले. 

हे वाचलं का?

प्रियांका पुढे म्हणाली, "माझ्या आईला जिने मला जन्म दिला. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई, तू सुद्धा आज पहिल्यांदा आई झाली आहेस. मी तुझ्यावर प्रेम करते. माझी छोटी परी मालती जिने आयुष्य यशस्वी केले. धन्यवाद. जगभरातील प्रत्येकाला ज्यांनी मला संदेश दिला आणि माझ्याबद्दल विचार केला त्याबद्दल धन्यवाद, अशा शब्दात प्रियांकाने चाहत्यांचे सुद्धा आभार मानले. 

हे ही वाचा : Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचं हमीपत्र कसं करायचं अपलोड?

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nick Jonas (@nickjonas)

निक जोनसची प्रियांकासाठी खास पोस्ट

निक जोनसने बायको प्रियांकासाठी खास पोस्ट लिहिली आहे. प्रियांकाचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने स्वत:ला भाग्यवान म्हटलं आहे. "तू काय स्त्री आहेस...मी खूप भाग्यवान आहे. हॅपी बर्थडे माय लव्ह", असं कॅप्शन निक जोनसने पोस्टला दिलं आहे. निकच्या या फोटोंवर चाहत्यांनीही कमेंट करत प्रियांकाला शुभेच्छा दिल्या आहेत
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT