Pooja Khedkar: पूजा खेडकरांची IAS ची नोकरी जाणार? UPSC कडून गुन्हा दाखल

मुंबई तक

FIR against IAS Pooja Khedkar: IAS पूजा खेडकर यांची नोकरीच आता धोक्यात आली आहे. कारण त्यांच्याविरोधात यूपीएससीने गुन्हा दाखल केला असून त्यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

पूजा खेडकरांवर UPSC कडून गुन्हा दाखल
पूजा खेडकरांवर UPSC कडून गुन्हा दाखल
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पूजा खेडकरांची नोकरी आली धोक्यात

point

पूजा खेडकरांविरोधात UPSC कडून FIR

point

पूजा खेडकर यांनी सादर केलेली बोगस प्रमाणपत्र

UPSC FIR against IAS Pooja Khedkar: पुणे: पूजा खेडकरांवर मोठी कारवाई करण्याचा निर्णय UPSC ने घेतला आहे. पूजा खेडकर यांच्यावर UPSC ची फसवणूक केल्याचा जो आरोप होत आहे त्याच प्रकरणी आता यूपीएससीने पूजा खेडकर यांच्याविरोधात FIR दाखल केली आहे. त्यामुळे आता पूजा खेडकर यांची IAS पदाची नोकरी ही धोक्यात आली आहे.

IAS नोकरी गमावणार पूजा खेडकर... UPSC नेमका का दाखल केला गुन्हा? 

पूजा खेडकर यांनी UPSC परीक्षा देण्यासाठी जी काही प्रमाणपत्र सादर केली होती ती चुकीची किंवा बोगस असल्याचं समोर आलंय. त्यामुळेच आता या प्रकरणी UPSC कडून पूजा खेडकर यांच्याविरोधात FIR दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे ही वाचा>> Pooja Khedkar: अखेर IAS पूजा खेडकर आल्या कॅमेऱ्यासमोर, म्हणाल्या मला...

पूजा या 2018 पर्यंत सामान्य विद्यार्थिनी म्हणून परीक्षा देत होत्या. पण त्यानंतर त्यांनी स्वत:चं नाव बदललं, तसंच त्या दिव्यांग असल्याची एकाहून अधिक प्रमाणपत्रं त्यांनी मिळवली. ही प्रमाणपत्रं मिळविताना त्यांनी काही माहिती दडवली. त्याचबरोबर जेव्हा यूपीएससीकडून त्यांच्या वैद्यकीय चाचणीसाठी त्यांना विचारणा झाली तेव्हा-तेव्हा त्या गैरहजर राहिल्या. 

हे सगळे प्रकार समोर आल्यानंतर यूपीएससीने हे पाऊल उचललं आहे. केवळ IAS पद रद्द करणं नव्हे तर ते मिळविण्यासाठी जी कृत्य त्यांनी केली आहेत तो एक गंभीर गुन्हा आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आता यूपीएससीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचं ठरवलंय.

हे वाचलं का?

    follow whatsapp