Rajeshwari Kharat : अखेर ‘जब्या’ला काळी चिमणी घावली! ‘शालू’सोबत नात्यात असल्याची चर्चा
फँड्री या सिनेमातून घराघरात पोहोचलेले आणि तरूण-तरूणींच्या गळ्यातले ताईत बनलेले अभिनेता सोमनाथ अवघडे (जब्या) आणि अभिनेत्री राजेश्वरी खरात (शालू) ही ऑनस्क्रिन जोडी आता रियल लाईफमध्ये प्रेमात पडल्याची चर्चा आहे.
ADVERTISEMENT
Rajeshwari Kharat and Somnath Awghade : प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फँड्री या सिनेमातून घराघरात पोहोचलेले आणि तरूण-तरूणींच्या गळ्यातले ताईत बनलेले अभिनेता सोमनाथ अवघडे (जब्या) आणि अभिनेत्री राजेश्वरी खरात (शालू) ही ऑनस्क्रिन जोडी आता रियल लाईफमध्ये प्रेमात पडल्याची चर्चा आहे. या संबंधित एक व्हिडिओ शालूने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओनंतर दोघांच्या नात्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान या व्हिडिओत काय आहे? आणि जब्या आणि शालू खरचं नात्यात आहेत का? हे जाणून घ्या.(rajeshwari kharat share video with somnath awaghade shalu jhabya relationship fandry actor actress)
ADVERTISEMENT
नागराज मंजुळे यांचा फॅड्री हा सिनेमात खूप गाजला होता. या सिनेमात अभिनेता सोमनाथ अवघडे आणि अभिनेत्री राजेश्वरी खरात यांची नवीन जोडी मोठ्या पडद्यावर झळकली होती. या सिनेमात जब्या हा खालच्या जातीतला शाळेत जाणार मुलगा, शालू नावाच्या उच्चवर्गीय मुलीच्या प्रेमात पडताना दाखवला आहे. सिनेमात काळ्या चिमणीची राख अंगावर टाकली की शालू आपली होईल, असा त्याला भोळा विश्वास असतो. सिनेमातील हाच काळ्या चिमणीचा डायलॉग आणि दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खुप आवडली होती. त्यामुळेच ती प्रेक्षकांना आजही लक्षात आहे.
हे ही वाचा : Sukhdev Singh Gogamedi Murder:’वाघाला फसवून मारलं, पण वाघीण अजून…’, गोगामेडीची पत्नी गरजली!
View this post on Instagram
हे वाचलं का?
दरम्यान सिनेमात तरी जब्याला शालू काय मिळाली नव्हती. पण खऱ्या आय़ुष्यात त्याला शालू मिळाली आहे. या मागचं कारण ठरलाय शालूने शेअर केलेला तो व्हिडिओ. राजेश्वरीने तिच्या इस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत जब्या बुलेटवर बसला आहे आणि त्याच्या बाजूनेच शालू येते. शालू जब्याचा हात धरून त्याचा कुशीत येते. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला सुंदरसे गाणेही वाजते आहे.
हे ही वाचा : Sharmistha Mukherjee :”सोनिया गांधी मला पंतप्रधान करणार नाही”, गांधी कुटुंबाबद्दल गौप्यस्फोट
शालूच्या या व्हिडिओवर अनेकांनी भन्नाट लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. एका युझरने या व्हिडिओवर जब्याला लॉटरी आणि काळी चिमणीची राख दोन्ही मिळाल्या वाटतं अशी भन्नाट कमेंट केली आहे. तर दुसऱ्या युझरने दोघांचे अभिनंदन केले आहे. याच व्हिडिओवरून शालू आणि जब्या रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे राजेश्वरीने देखील या व्हिडिओच्या कॅप्शनला सोमनाथ अवघडेला टॅग करून लव्ह इमोजी शेअर केला आहे. त्यामुळेच दोघे नात्यात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान दोन्हीही कलाकारांनी नात्यात असल्याची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही आहे. ही निव्वळ सोशल मिडियावर चर्चा आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT