मुंबई Tak बैठक: रितेश देशमुख राजकारणात प्रवेश करणार? खरं काय ते सांगूनच टाकलं!
Riteish Deshmukh join politics:रितेश देशमुख राजकारणात प्रवेश करणार का? असा सवाल नेहमी उपस्थित होत असतो.याच प्रश्नावर आता रितेश देशमुख याने मुंबई Takबैठकीत उत्तर दिले आहे.
ADVERTISEMENT
Riteish Deshmukh join politics :राजकारणाशी रितेश देशमुखचे (Riteish Deshmukh) यांचे जुने नाते आहे. कारण त्याचे वडिल स्व. विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. विलासराव देशमुख यांच्यासह रितेशला वगळता त्याची दोन मुले देखील राजकारणात होती. त्यामुळे रितेश देशमुख राजकारणात प्रवेश करणार का? असा सवाल नेहमी उपस्थित होत असतो.याच प्रश्नावर आता रितेश देशमुख याने मुंबई Takबैठकीत उत्तर दिले आहे. (riteish deshmukh join politics rumours after mumbai tak baithak interview)
ADVERTISEMENT
गुरूवारी ताज प्रेसिडेंट हॉलमध्ये मुंबई Tak बैठक कार्यक्रम पार पडला. या बैठकीत सल्लागार संपादक, सीनियर प्रोड्युसर राजदीप सरदेसाई आणि सीनियर प्रोड्युसर अजय परचूरे यांनी बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याची मुलाखत घेतली होती.या मुलाखतीच्या सुरूवातीलाच राजदीप सरदेसाई यांनी रितेश देशमुखला पहिलाच रॅपिड फायर प्रश्न विचारला होता. राजकारण की सिनेमा? या प्रश्नाला त्यांनी राजकारण असे उत्तर दिले होते. राजकारणाची आवडं आहे, त्या वातावरणात वाढलोय असे रितेश देशमुख म्हणाला होता. त्याच्या या उत्तरानंतर रितेश देशमुख राजकारणात एन्ट्री मारणार अशी चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.
हे ही वाचा : एकनाथ शिंदेंचा ‘तो’ किस्सा आदित्य ठाकरेंनी सांगितला जसाचा तसा..
अमित राजकारणात, धीरज राजकारणात आहे, त्यामुळे घराणेशाहीचा वाद नको म्हणून जी काही स्वप्ने आहेत ती चित्रपटात भूमिका करून पुर्ण करेने, ते सोप्प आहे,असे दिलखुलास उत्तर देखील रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) दिले. मला अभिनेता व्हायचं नव्हतं, मला संधी मिळाली आणि मी चित्रपट केला, आज 20 वर्ष झाली इंडस्ट्रीत काम करतोय, लोकांनी प्रेम दिलं म्हणून आज आहे,असे देखील रितेश म्हणाला. तसेच सध्या मी जे काम करतोय, त्याच्यात माझं हृदय आहे. आणि तेच मरेपर्यंत करावं अशी माझी इच्छा असल्याचे रितेशने सांगितले.
हे वाचलं का?
…म्हणून मराठी चित्रपट चालत नाहीत
एखादा चित्रपट जेव्हा रिलीज होतो, तेव्हा प्रेक्षकाला रिलीजआधी वाटलं पाहिजे, मला हा सिनेमा बघायचाय. मराठी सिनेमाबाबत ते घडताना दिसत नाही. जो पर्यंत चित्रपट प्रमोट होत नाही, लोकांना वाटत नाही आपल्याला पाहायचेत, तिथपर्यंत तो चालणार नाही,असे रितेश म्हणतोय. अनेक चांगले चित्रपट आहेत. पण पहिल्या आठवड्यात चित्रपट चालला की पुढच्या आठवड्यात जाऊ तिथपर्यंत चित्रपटच नसतो. आपण जी संधी हिंदी सिनेमाला देतोय, ती मराठी चित्रपटांना देत नाही,अशी खंत देखील त्याने व्यक्त केली.
हे ही वाचा : वाझे, परमबीर प्रकरणात अनिल देशमुखांकडून पुन्हा मोठा गौप्यस्फोट
वडिलांचा ‘तो’ किस्सा सांगितला
पहिला सिनेमा जेव्हा वडिल विलासराव देशमुख यांना दाखवला तेव्हा ते म्हणाले होते, जेनिलियाचा अभिनय तुझ्यापेक्षा खुप चांगला आहे. मला वाटलेले माझे वडिल माझा अभिनय पाहून फार खुश होतील, पण ते म्हणाले, जेनिलियाने तुझ्यापेक्षा चांगला अभिनय केलाय. तेरे नाल लव हो गया सिनेमा बघायला गेलो, चित्रपट बघितला आणि म्हणाले अजूनही तिने तुझ्यापेक्षा चांगला अभिनय केला. आणि आजही ते असते आणि त्यांनी वेड पाहिला असता, तर त्यांना जेनेलीयाचाच अभिनय आवडला असता, असा रितेश देशमुख (Riteish Deshmukh) म्हणाला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT