Pondicherry Film Review: सई,अमृताच्या अभिनयासाठी आणि नितांतसुंदर पाँडिचेरी अनुभवण्याचा सिनेमा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रत्येक प्रश्न झटपट सोडवण्याची घाई नको ना….. पॉडिचेरी या सिनेमातील सई ताम्हणकरच्या तोंडी असलेलं हे वाक्य… आणि हे खरंच आहे म्हणा.. या जगातील प्रत्येकाला आपल्या आयुष्यात प्रश्न आहेत आणि ते प्रत्येकालाच आपआपल्या पध्दतीने सोडवायचे आहेत.. कधी गुंता जास्त आहे तर कधी कमी पण प्रश्न आहेतच की… पण ते सोडवण्याची घाई नको त्याची दिशा ठरली की ते आपोआप सुटुन जातील.. पॉडिचेरी हा तो प्रयत्न आहे… पॉडीचेरी हा एक नितांत सुंदर अनुभव आहे… आणि तो तुम्ही एकदातरी अनुभवायला काही हरकत नाही…

ADVERTISEMENT

निसर्गाची मुक्तपणे उधळण झालेल्या ‘पाँडीचेरी’ शहरात घडणारी ही कथा आहे. निकीता जी आपल्या मुलासोबत पॉडिचेरी मध्ये एकटीच राहतेय.. तिचा नवरा नेव्ही अधिकारी असल्याने ६ महिन्यांनी परतत असतो.. आपल्या नवऱ्याची आतुरतेने वाट पाहणारी निकीता… पॉडिचेरीमधल्या आपल्या हेरिटिज घरात देशविदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी आपल्या घरातच हॉलिडे स्टेला सुरवात करते.. तशी ती पॉडिचेरीमधली प्रसिद्ध गाईड आहे पण नवऱ्याच्या अनुपस्थित गुजराण होण्यासाठी तिने आपल्या घरात या हॉलिेड स्टेला सुरवात केलीय यात तिच्या राहत्या घरात निरनिराळे लोक जगभरातून येत असतात.. .. आयुष्यात बरेच प्रश्न असणारी निकीता तरीही धीटाने हा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करतेय.. दुसरीकडे असंच एकदा रोहन या हॉलिडे स्टेमध्ये राहायला येतो.. हेरिटेज वास्तू,घरांमधील लोकांना फसवून त्यांची घरं मोठ्या मोठ्या हॉटेल्स,रिसॉर्टला विकणारा हा माणूस .असा हा अजीबोगरीब क्षेत्रात काम करणारा हा रोहन या हॉलिडे स्टेमध्ये आपल्या गतआयुष्यात घडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधू पाहतोय.. तर तिसरीकडे याच हॉलिडे स्टेमध्ये मानसी आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत येते. जिचे आयुष्य अत्यंत गुंतागुंतीचे होते आणि भूतकाळात झालेल्या आघातांवर ती मात करण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे सिनेमात दिसत राहणारं निसर्गरम्य पॉडिचेरी आणि दुसरीकडे या तिघांच्या आयुष्यात एकाचवेळी घडणारी स्थित्यंतरं याची हळूहळू सांगड होत असते.. पण मग या तिघांच्या आयुष्यातील गुंता सुटतो का? या तिघांना आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात का? हे पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी आपल्या जवळच्या थिएटर्समध्ये एकदा जाऊन हा सिनेमा पाहायला काहीच हरकत नाहीये…

हे वाचलं का?

स्मार्टफोनवर चित्रीकरण करून प्रदर्शित होणारा भारतातील पहिला मराठी चित्रपट ‘पॉंडीचेरी’. अवघ्या एका महिन्यात या अनोख्या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. आपल्याला या आधी गुलाबजाम नावाचा उत्तम सिनेमा देणारा दिग्दर्शक सचिन कुंडलकरने पॉडिचेरीमध्येही आपल्या अपेक्षा वाढवल्या आहेत.. ‘पॉंडीचेरी’चे निसर्गसौंदर्य, अथांग समुद्रकिनारे, रंगीबेरंगी फ़्रेंच धाटणीची घरे आणि या शहरात निर्माण होणारे अनोखे नातेसंबंध याचं उत्तम चित्रण आयफोनद्वारे सचिनने अगदी अस्सल उभं केलं आहे.. सुरवातीला हा सिनेमा थोडा संथ वाटतो.. पण एकदा कथेने पकड घेतली की पॉडिचेरी आपल्याला भावू लागतो. तेजस मोडक आणि सचिन कुंडलकरच्या अगदी रिफ्रेश कथेमुळे हा सिनेमा आपल्याला आवडू लागतो.नातेसंबंधासोबतच डोळ्यांना मोहित करणारं पॉडिचेरी आपल्याला आयफोनवरून तितकंच अस्सलपणे दाखवण्याचं कसब सिनेमँटोग्राफर मिलिंद जोगने फारच उत्तम केलं आहे. देब्रितो साहाचं संगीत सिनेमाच्या मूडला साजेसं आहे…

ADVERTISEMENT

सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकर एकत्र काम करतायत म्हटल्यांवर तुम्हांला काहीतरी ग्लँमरस पाहायला मिळेल या अपेक्षेने पाहायला जात असाल तर जरा थांबा, या दोघींनीही या सिनेमात फक्त आणि फक्त अप्रतिम अभिनय केलाय… आणि आपण ग्लँमरपेक्षाही किती सशक्त अभिनेत्री आहोत हे पुन्हा एकदा निकीता आणि मानसीच्या व्यक्तिरेखेतून दाखवून दिलंय.. हा या सिनेमाचा यूएसपी आहे.रोहनच्या भूमिकेतील वैभव तत्तववादीनेही त्याच्या व्यक्तिरेखेतील अनेक छटा अगदी उत्तम साकारल्या आहेत .. या सिनेमातील सरप्राईज पँकेज आहे तन्मय कुलकर्णी हा बालकलाकार.. इशानच्या भूमिकेत त्याने दाखवलेली समज लाजवाब आहे… नीना कुलकर्णी, महेश मांजरेकर, गौरव घाटणेकर यांनी आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.

ADVERTISEMENT

तेव्हा सई,अमृताचा सशक्त अभिनय, वैभव तत्तववादीचा हटके अंदाज,सचिन कुंडलकरच्या दिग्दर्शन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अतिशय सुंदर पॉडिचेरी अनुभवण्यासाठी हा सिनेमा एकदा का होईना पाहायलाच हवा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT