Arpita Khan Diamond Earring : थेट सलमान खानच्या बहिणीच्या घरी मारला डल्ला, कोण आहे ‘तो’ चोरटा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Salman khan sister arpita diamond earring stolen
Salman khan sister arpita diamond earring stolen
social share
google news

Salman khan sister arpita diamond earring stolen : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) यांची बहिण अर्पिता शर्मा (Arpita Sharma) हिच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली होती.या घटनेप्रकरणी आता आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. संदीप हेगडे (30 वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. हा आरोपी अर्पिताच्या घरी हाऊसकीपिंगचं काम करायचा. या आरोपीकडून आता चोरी झालेला माल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.(salman khan sister arpita files police complaint of diamond earring stolen police arrested housekeeping boy)

ADVERTISEMENT

सलमान खानची (Salman Khan) बहिण अर्पिता शर्मा (Arpita Sharma) हिच्या घरातूनच हिऱ्याचे झुमके (कानातल्या) चोरीला गेल्याची घटना घडली होती. पाच लाख किमतीचे हे हिऱ्याचे झुमके होते. हे हिऱ्याचे झुमेक तिने तिच्या मेकअपच्या ट्रेमध्ये ठेवले होते. या झुमक्याची घरी शोधाशोध करून देखील ते साडपले नव्हते. त्यामुळे तिचे महागडे झुमके घरातूनच चोरीला गेल्याची घटना घडली होती. 16 मे 2023 रोजी ही घटना घडली होती. या घटनेप्रकरणी अर्पिताने खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीचा शोध सुर केला होता.

हे ही वाचा : कोण आहे पूजा ददलानी? जिने आर्यन खानला वाचवण्यासाठी घेतली होती खूप मेहनत..

हाऊसकीपिंग स्टाफच निघाला चोर

अर्पिताच्या (Arpita Sharma) या तक्रारीनंतर खारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन माने यांच्या नेतृत्वाखाली पीआय विनोद गावंकर, पीएसआय लक्ष्मण काकडे, पीएसआय गवळी यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाची स्थापना केली होती. या पथकाने घटनेचा तपास करून 30 वर्षीय आरोपी संदीप हेगडे याला ताब्यात घेतले. हा आरोपी विलेपार्लेच्या आंबेवाडी झोपडपट्टीत सापडला आहे. अर्पिताच्या (Arpita Sharma) घरात 14 हाऊसकिपिंग स्टाफ काम करते. या हाऊसकिपिंग स्टाफमधला संदीप हेगडे हा एक होता. हेगडे हा चार महिन्यापूर्वी अर्पिताच्या घरी कामाला लागला होता. या दरम्यान त्याने हातचलाखीने अर्पिताचे पाच लाख किंमीतीच हिऱ्याचे कानातले लांबवले होते. आता या संदीप हेगडेला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

हे वाचलं का?

दरम्यान आता या प्रकरणात पोलिसांनी संदीप हेगडे याच्याकडून हिऱ्याचे कानातले ताब्यात घेतले आहे. तसेच संदीप हेगडेवर कलम 381अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आणि हेगडेला पोलिस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करतायत.

हे ही वाचा : “मी सुकेशसोबत….” नोरा फतेहीचा चौकशीदरम्यान मोठा खुलासा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT