मनसेला खिंडार, त्यावर संजय मोने म्हणतात…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज ठाकरेंच्या मनसेला खिंडार पडल्याच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर अभिनेते संजय मोने यांची मनसे आणि राज ठाकरेंबद्दलची एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतीय. मनसेतून एखादा नेता दुस-या पक्षात जातो तेव्हा त्याची मोठी बातमी का होते, याबद्दल भाष्य केलंय. संजय मोने यांनी त्यात राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं कौतुक करताना, माझ्या मतदारसंघात नितीन सरदेसाईंनी घेतलेल्या कष्टाबद्दल त्यांना आणि त्यांच्या सहका-यांना पावती देणं हे आपलं कर्तव्य असल्याचं म्हंटलं आहे.

ADVERTISEMENT

आपल्या पोस्टमध्ये संजय मोने म्हणतात की, या मधल्या “lock down”च्या काळात सत्ता हाताशी नसतांना ज्यांनी तुम्हाला मदत केली, ते जरा लक्षात ठेवा..माझ्या मतदार संघात, जो स्वतः राज ठाकरे यांचाही आहे,श्री.नितीन सरदेसाई यांनी जे काही कष्ट केले, त्यांना आणि त्यांच्या सहका-यांना त्याची पावती देणं हे आपलं कर्तव्य आहे..कर्तव्य म्हटलं की उगाच जबाबदारी येते..तर थोडा शब्दप्रयोग बदलतो,तर..आपला हक्क आहे असं समजा..

हे वाचलं का?

डोंबिवलीतले मनसेचे माजी विरोधी पक्षनेते, गटनेते मंदार हळबे भाजपत प्रवेश करणार आहेत. दादर पक्ष कार्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे. कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात याआधी सोमवारी मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर मोने यांची पोस्ट विशेष गाजते आहे. राज ठाकरे आणि संजय मोने यांचं निवासस्थान एकाच भागात असून त्यांच्यात जुने मैत्रिचे संबंध आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT