Abhijeet Bhattacharya : ‘शाहरूख खान लोकांचा वापर करून घेतो’, प्रसिद्ध गायक काय म्हणाला?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

shah rukh khan news abhijeet bhattacharya singer big statement on shah rukh khan bollywood actor 
shah rukh khan news abhijeet bhattacharya singer big statement on shah rukh khan bollywood actor 
social share
google news

Abhijeet Bhattacharya On Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान, शाहरूख खानने (Shah Rukh Khan) त्याच्या जवान (Jawan Movie) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालून अनेक रेकॉर्ड मोडले. हे रेकॉर्ड मोडून शाहरूखने त्याच्या अभिनयाची जादू पुन्हा दाखवली होती. शाहरूख अभिनेत्यासह एक व्यक्ती म्हणून खूप चांगला आहे, अशा अनेक बातम्याही समोर आल्या आहेत. असे असतानाच आता गायक अभिजीत भट्टाचार्याने (Abhijeet Bhattacharya) शाहरूखवर गंभीर आरोप केला आहे. शाहरूख लोकांचा वापर करून घेतो आणि आपल्या यशाच्या मार्गात कुणालाही येऊ देत नाही असे अभिजीत भट्टाचार्य यांनी सांगितले आहे. भट्टाचार्य यांच्या या विधानाची चर्चा रंगली आहे.(shah rukh khan news abhijeet bhattacharya singer big statement on shah rukh khan bollywood actor)

गायक अभिजीत भट्टाचार्याने (Abhijeet Bhattacharya) नुकतीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत शाहरूख खानबाबत त्यांनी मोठं विधान केले आहे. माझी आणि शाहरूख खानची पर्सनालिटी एक दुसऱ्यापेक्षा खूपच वेगळी आहे. तर शाहरूख हा सेल्फ मेड मॅन आहे असल्याची प्रशंसा भट्टाचार्य यांनी केली. शाहरूखमध्ये स्वाभिमान आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी आहेत. या गोष्टी माझ्या व्यक्तिमत्वात देखील आहेत. पण माझ्यात अंहकार नाही आहे, पण स्वाभिमान आहे, असे देखील अभिजीत भट्टाचार्य सांगतो.

हे ही वाचा : Lok Sabha 2024 : ईशान्य मुंबईतून ठाकरेंचा उमेदवार ठरला! कोण आहेत संजय पाटील?

मी माझ्या आणि शाहरूख खानमधल्या व्यक्तिमत्वाचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण याचा काहीच फायदा झाला नाही. तसेच शाहरूख खान हा व्यावसायिक व्यक्ती आहे. जो दुसऱ्या लोकांचा वापर करतो आणि आपल्या यशाच्या मार्गात कुणालाही येऊ देत नाही, असे अभिजित भट्टाचार्य म्हणाला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अभिजीत भट्टाचार्य पुढे म्हणाला की, शाहरूख खानला अँटी नेशनल (देशद्रोही) म्हणणे चुकीचे आहे. अनेकांनी असा प्रयत्न केला, पण शाहरूख पेक्षा मोठा राष्ट्रवादी कोणी नाही. ‘फिर भी दिल है हिदुस्तानी’, ‘स्वदेश’ आणि ‘अशोका’ हे सिनेमे पाहा, त्याच्यावर अँटी नेशनलचे आरोप कसे होऊ शकतात.

हे ही वाचा : Prithviraj Chavan : “राष्ट्रवादीने सरकार पाडले नसते, तर मराठा आरक्षणाचा…”

अभिजीत भट्टाचार्याने शाहरूखच्या अनेक सिनेमातील गाण्यांना आवाज दिला आहे. अंजाम चित्रपटातील ‘बडी मुश्किल है’, येस बॉस सिनेमातील ‘मैं कोई ऐसा गीत गाऊं’ आणि मैं हूं ना सिनेमातील ‘मैं तुम्हे जो मैंने देखा’ ही गाणी अभिजीतने गायली आहे. तर बिल्ली सिनेमातील एका गाण्याला अभिजीत भट्टाचार्याने शेवटचा आवाज दिला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT