अभिनेता शशांक केतकर प्रथमच साकारणार नकारात्मक भूमिका
शशांक केतकरची २०१३ मध्ये आलेली ‘होणार सून मी ह्या घरची’ ही मालिका प्रचंड गाजली आणि ह्या मालिकेतून घराघरात पोचलेला आणि तरुणींच्या गळ्यातला गळ्यातला ताईत असलेला ‘श्री’ म्हणजेच सर्वांचा लाडका शशांक केतकर ह्याचं झी मराठीवर पुनरागमन होतंय, “पाहिले न मी तुला” ह्या मालिकेतून तो पुनरागमन करतोय, पण शशांक ह्या मालिकेत समरप्रताप ही नकारात्मक (निगेटिव्ह) भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच या मालिकेचा टीझर […]
ADVERTISEMENT
शशांक केतकरची २०१३ मध्ये आलेली ‘होणार सून मी ह्या घरची’ ही मालिका प्रचंड गाजली आणि ह्या मालिकेतून घराघरात पोचलेला आणि तरुणींच्या गळ्यातला गळ्यातला ताईत असलेला ‘श्री’ म्हणजेच सर्वांचा लाडका शशांक केतकर ह्याचं झी मराठीवर पुनरागमन होतंय, “पाहिले न मी तुला” ह्या मालिकेतून तो पुनरागमन करतोय, पण शशांक ह्या मालिकेत समरप्रताप ही नकारात्मक (निगेटिव्ह) भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच या मालिकेचा टीझर प्रदर्शित झाला. ज्या टीझरमधून शशांक केतकरची ही हटके भूमिका लोकांसमोर आली आहे.
ADVERTISEMENT
शशांक सोबत ह्या मालिकेत ‘माझा होशील ना’ ह्या मालिकेतून घराघरात पोचलेला डॉ. सुयश पटवर्धन अर्थात आशय कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे, तर तन्वी मुंडले हा नवीन चेहेरा ह्या दोघांसोबत दिसेल.पाहिले न मी तुला ही कथा आहे, मानसी आणि अनिकेतच्या अतूट प्रेमाची आणि विश्वासाची. हे प्रेम लग्नाच्या नात्यात अडकण्याआधीच समरच्या विक्षिप्त नजरेत येतं. तिथूनच मानसी आणि अनिकेतच्या आयुष्यातील ससेहोलपट सुरू होते. पाठीवर छुपे वार करणाऱ्या नीच प्रवृत्तीच्या समरला अनिकेत मानसी कसे सामोरे जातील हे दिसून येईल
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT