शिवसेनेचे माजी खासदार आणि चित्रपट निर्माते प्रीतिश नंदी यांचं निधन
प्रसिद्ध कवी आणि लेखक प्रीतिश नंदी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांचा मुलगा कुशन नंदी यांनी दुजोरा दिला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर बॉलिवूड कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: प्रसिद्ध चित्रपट निर्माते, कवी आणि लेखक आणि शिवसेनेचे माजी राज्यसभा खासदार प्रीतिश नंदी यांचे निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबाबतची माहिती त्यांचा मुलगा कुशन नंदी यांनी दिली आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी प्रीतिश नंदी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. (shiv sena former rajya sabha mp and film maker pritish nandy passed away he had made films like chameli and pyaar ke side effects)
प्रीतीश नंदीची आठवण करून, अनुपम खेर यांनी X वर लिहिले, 'माझ्या सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक प्रीतिश नंदी यांच्या निधनाबद्दल कळालं, खूप दुःख झाले आणि धक्का बसला. ते एक अद्भुत कवी, लेखक, चित्रपट निर्माता आणि एक धाडसी आणि अद्वितीय संपादक/पत्रकार होते. मुंबईतील माझ्या सुरुवातीच्या काळात ते माझी सपोर्ट सिस्टीम आणि ताकदीचा स्रोत होते. आम्ही अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.'
ते म्हणाले की, 'मला भेटलेल्या सर्वात निर्भय लोकांपैकी ते एक आहेत. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. गेली काही वर्षे आमची भेट होत नव्हती, पण एक काळ असा होता जेव्हा आम्ही एकमेकांच्या खूप जवळ होतो.'
खासदारही होते प्रीतिश नंदी
प्रसिद्ध लेखक प्रीतिश नंदी यांनी राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलं होतं. ते शिवसेनेकडून राज्यसभेत निवडून गेले होते. ते सहा वर्ष संसदेचे सदस्य होते. याशिवाय ते संरक्षण संसदीय समिती, दळणवळणासाठी संसदीय समिती, परराष्ट्र व्यवहारावरील संसदीय समिती यासह अनेक समित्यांचे सदस्य होते. नंदी यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अपग्रेडेशनसाठी तज्ज्ञ समितीचे देखील नेतृत्व केले होते आणि 2011 मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला त्यांचे निष्कर्ष सादर केलेले.
प्रीतिश नंदी यांचे अनेक संस्मरणीय चित्रपट
प्रीतिश नंदी यांनी 1993 मध्ये प्रीतिश नंदी कम्युनिकेशन्सची स्थापना केली आणि ते त्याचे गैर-कार्यकारी अध्यक्ष होते. त्यांच्या कंपनीचा पहिला कार्यक्रम द प्रीतिश नंदी शो नावाचा चॅट शो होता. जो भारताच्या सार्वजनिक प्रसारण वाहिनी दूरदर्शनवर प्रसारित झाला होता. भारतीय टीव्हीवर प्रसारित होणारा हा पहिला सिग्नेचर शो होता. यानंतर, फिस्कल फिटनेस: प्रितिश नंदी बिझनेस शो, भारतातील पहिला साप्ताहिक व्यवसाय शो, झी टीव्हीवर प्रसारित झाला होता.
त्यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक संस्मरणीय चित्रपटांची निर्मिती केली, ज्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले. त्यांची कंपनी प्रीतिश नंदी कम्युनिकेशन्सने भारतात मल्टिप्लेक्स चित्रपट प्रकाराची सुरुवात केली.
'या' केली चित्रपटांची निर्मिती
कुछ खट्टी कुछ मिठी, द मिस्टिक मासूर, सूर, कांते, झंकार बीट्स, मुंबई मॅटिनी, चमेली, पॉपकॉर्न खाओ! मस्त हो जाओ, शब्द, हजारों ख्वैसें ऐसी, एक खिलाडी एक हसीना, अंकही, प्यार के साइड इफेक्ट्स, बो बरॅक फॉरेव्हर, जस्ट मॅरीड, अग्ली और पगली, मीराबाई नॉट आउट, धीमे धीमे, रात गई बात गई?, क्लिक, मोटा ! शादी के साइड इफेक्ट्स, मस्तीजादे सारख्या चित्रपटांची निर्मिती केली.
