Shreyas Talpade : घरी आला अन् बेशुद्ध पडला; हार्ट अटॅक आधी श्रेयससोबत काय घडलं?
shreyas talpade heart attack : वेलकम टू जंगल या चित्रपटाचे शूटिंग संपवून श्रेयस तळपदे घरी गेला. अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार त्याने पत्नीकडे केली. यानंतर अभिनेता बेशुद्ध झाला. पत्नी दीप्ती तळपदेने त्याला तातडीने रुग्णालयात हलवले. रुग्णालयात दाखल होताच डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी केली.
ADVERTISEMENT

Shreyas Talpade News in Marathi : अभिनेता श्रेयस तळपदेला ह्रदयविकाराचा झटका झाल्याची घटना समोर आली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तो रुग्णालयात असून, सेलिब्रिटींसह त्याचे चाहते तो बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.
गुरुवारी (14 डिसेंबर) संध्याकाळी बॉलिवूडमधून धक्कादायक बातमी समोर आली. प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला तातडीने मुंबईतील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी श्रेयस तळपदेवर तातडीने अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली. त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. श्रेयसची तब्येत आता कशी आहे याबद्दलचे अपडेट समोर आले आहे.
श्रेयसला डिस्चार्ज कधी मिळणार?
रुग्णालय प्रशासनाने अभिनेता श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबाबत अपडेट दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी (14 डिसेंबर) सायंकाळी श्रेयसला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 10 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाली. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्याला काही दिवसांत डिस्चार्ज दिला जाणार आहे.
हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी केला होता अॅक्शन सीन
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता मुंबईत वेलकम टू जंगल या चित्रपटाचे शूटिंग करत होता. अक्षय कुमारने चित्रपटाच्या सेटचा एक व्हिडिओ इन्स्टावर शेअर केला आहे. यात श्रेयसही दिसत आहे. व्हिडिओमध्ये अक्षय स्टंट करत आहे. श्रेयस त्यांच्या मागे जिन्यावर उभा आहे. व्हिडिओमध्ये कलाकार मस्ती करताना दिसले. पण पुढच्याच क्षणी श्रेयसच्या बाबतीत असं काही घडेल याची कोणालाच कल्पना नव्हती.