Gadar 2 स्टार सनी देओलचा मुंबईतील बंगला विकणार, बँकेला किती कोटी हवेत?
सनी देओलचा मुंबईतील जुहू भागात बंगला आहे. सनी व्हिला असे या बंगल्याचे नाव आहे. सनी देओलने कर्ज घेताना हा बंगला तारण ठेवला होता. कर्जाची परतफेड करता न आल्याने बँकेने बंगला लिलावात काढला आहे.
ADVERTISEMENT

Sunny Deol Mumbai House : सनी देओल सध्या सर्वत्र चर्चेत आहे. त्याचा नुकताच ‘गदर 2’ चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. गेल्या आठवड्यात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 9 दिवसांत इतकी कमाई केली आहे की तो बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. 90 च्या दशकात बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक असलेल्या सनीला मधल्या दोन दशकांमध्ये खूप संघर्ष करावा लागला आणि त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकले नाहीत.
आता अखेर ‘गदर 2’ ने त्याला ते भव्य यश दाखवून दिले आहे, ज्याची तो बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होता. पण एकीकडे सनीचा चित्रपट थिएटरमध्ये प्रचंड कमाई करत असताना दुसरीकडे खऱ्या आयुष्यात त्याच्या एका मोठ्या प्रॉपर्टीचा लिलाव होण्याची भीती आहे. सनीवर बँकेचे मोठे कर्ज होते, ज्याच्या वसुलीसाठी बँकेने आता त्याच्या मुंबईतील मालमत्तेचा लिलाव करण्यासाठी जाहिरात काढली आहे.
काय प्रकरण आहे?
बँक ऑफ बडोदाने सनी देओलच्या सनी व्हिलाच्या लिलावासाठी वर्तमानपत्रात जाहिरात दिली आहे. सनीने बँकेकडून मोठ्या रकमेचे कर्ज घेतले होते. या कर्जासाठी त्याने मुंबईतील जुहू परिसरात असलेला ‘सनी व्हिला’ नावाची प्रॉपर्टी गहाण ठेवली होती. त्याऐवजी त्याला जवळपास 56 कोटी रुपये बँकेत भरायचे होते, जे अद्याप भरलेले नाहीत.
वाचा >> बॉक्स ऑफिसवर Gadar 2! 9 दिवसांत केली रेकॉर्डब्रेक कमाई, किती कोटी कमावले?
हे कर्ज आणि त्यावर आकारले जाणारे व्याज वसूल करण्यासाठी बँकेने या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या जाहिरातीत म्हटले आहे की ‘सनी व्हिला’चा लिलाव 25 सप्टेंबर रोजी होणार आहे. या लिलावासाठी मालमत्तेची आरक्षित किंमत 51.43 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.