या कारणाने बंद होणार ‘द कपिल शर्मा शो’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काही दिवसांपूर्वी ‘द कपिल शर्मा’ शो बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तर कपिल शर्माने या चर्चांना पूर्णविराम दिला असून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘द कपिल शर्मा’ शो बंद होणार असल्याने चाहत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र हा शो काही दिवस बंद होणार असल्याचं कपिल शर्माने सांगितलंय.

ADVERTISEMENT

शो बंद होणार यासंदर्भात ट्विटरवर एक चॅट झालं. यामध्ये हा शो बंद करण्यात येतोय का असा प्रश्न विचारला असता कपिलने त्यावर केवळ एक छोटासा ब्रेस असा रिप्लाय केला आहे. त्यामुळे ‘कपिल शर्मा शो’ काही काळाने पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान शो बंद करण्यामागचे कारण विचारलं असता कपिल म्हणाला, “मी लवकरच दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्यामुळे मला माझ्या पत्नीसोबत घरी राहायचं आहे.” कपिलने पहिल्यांदाच सोशल मीडियावर दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचं जाहीर केलं. तर ‘द कपिल शर्मा शो’ फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑफ एअर होणार आहे.

हे वाचलं का?

प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच बंद होणार आहे. मात्र थोड्यात दिवसांत कपिल पुन्हा नव्या अंदाजात एन्ट्री करणार आहे. त्यामुळे कपिल आणि टीमचा नवा अंदाज पाहण्यासाठी सर्वजण आतूर आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT