The Kerala Story : बलात्कार, आत्महत्या अन् शिरच्छेद… सीन कसे झाले शूट?

मुंबई तक

The kerala Story Exclusive : द केरळ स्टोरी प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमातील काही अंगावर येणाऱ्या प्रसंगांची चर्चा होतेय. चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर प्रशांतनु महापात्रा यांनी या सीनच्या शुटिंगबद्दल सांगितलं.

ADVERTISEMENT

how to shoot the kerala story horrible scene?
how to shoot the kerala story horrible scene?
social share
google news

द केरळ स्टोरी चित्रपट अडथळ्यांनंतर देशभरात प्रदर्शित झाला आहे. विषयामुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाबद्दल कर्नाटकातील प्रचारसभेत याचा उल्लेख करत दहशतवादाचा आणखी एक चेहरा असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, या चित्रपटातील काही दृश्ये ही प्रेक्षकांच्या अंगावर येणारी असून, त्याबद्दल चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर प्रशांतनु महापात्रा यांनी आजतकशी बोलताना भाष्य केलं आहे.

प्रशांतनु महापात्रा यांनी चित्रपटाच्या आशयाबद्दल बोलताना सांगितलं की, दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांच्यासोबत लव जिहादवर माहितीपट बनवला होता. त्यावेळी केरळात जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांशी संवाद झाला होता. त्याचवेळी असा चित्रपट बनवण्याची कल्पना डोक्यात आली. त्या माहितीपटातील काही दृश्यही या चित्रपटात वापरली गेली आहेत.

द केरळा स्टोरीच्या शुटिंगवेळी कशी होती मनस्थिती?

सिनेमॅटोग्राफर प्रशांतनु यांनी शुटिंगच्या वेळचा अनुभवही सांगितला. ‘सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करताना नेहमी भूमिकेपासून विभक्त होऊन आपलं काम करावं लागतं. आपण कितीही भावनिक असलो, तरी मन इतकं मजबूत करावं लागत. मन कठोर करून लायटिंग, कॅमेरा अँगल, शॉट्सचा दर्जा यासारख्या तांत्रिक बाबींवर जास्त लक्ष द्यावं लागतं. खरंतर हे काम खूप अवघड आहे. स्वतःशी एक युद्धच सुरू असतं. या सगळ्यात राहूनही तुम्हाला त्यापासून वेगळं ठेवावं लागतं.’

बलात्कार, हत्या… चित्रपटातील सीन असे केले शूट

‘चित्रपटाच्या शुटिंगवेळी रंगांबद्दल खूप काळजी घेतली गेली. म्हणजे अदा जेव्हा चौकशी कक्षात असते, तेव्हा आम्ही निळ्या रंगाचा वापर केला आहे. जेणेकरून तो सीन दिसावा. आम्ही मुद्दामहून जास्त गडद केलेला नाही. कारण शालिनी ही भूमिका एकाच ठिकाणी, एकाच खुर्चीवर बसून सर्व भावना प्रकट करते’, असं प्रशांतनु महापात्रा म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp