Twarita Nagar : ‘जाडी’ बोलून डिवचलं! अभिनेत्रीने ‘इतकं’ किलो वजन घटवलं

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

twarita nagar weight loss transformation journey youtuber and actress
twarita nagar weight loss transformation journey youtuber and actress
social share
google news

Twarita Nagar Weight Losss Journey : युट्यूबवरील अनेक सीरीजमध्ये काम करून सिनेमात एन्ट्री मारणारी त्वरिता नागर नुकतीच फुकरे 3 सिनेमाच्या गाण्यात झळकली आहे. त्वरिता नागरची मोठी फॅन फॉलोईंग आहे. तिच्या स्टाईल आणि फिटनेसचे चाहते दिवाने आहेत. सध्या जरी त्वरिता फिट दिसत असली तर, तिचे तब्बल 12 किलो वजन वाढले होते. हे वजन आता तिने घटवले आहे. या संदर्भातली वेट लॉस जर्नी आता त्वरिता नागरने आजतक सोबत शेअर केली आहे. (twarita nagar weight loss transformation journey youtuber and actress)

ADVERTISEMENT

वजन वाढण्याचे कारण काय?

त्वरिता तिची वेट लॉस जर्नी सांगताना म्हणाली की, मी किशोराअवस्थेत असताना माझ वजन सामान्य होतं. मी कधीच वजन वाढवलं नव्हतं. पण कोविड काळात माझं 10 किलो वजन वाढलं होतं. यामागचं कारण होतं मी खुप गोड खायची सवय होती आणि कोविड काळात मी खूप गोड खाल्ल होतं. त्यामुळे हळुहळू माझ वजन 68 किलो वाढलं होतं.

हे ही वाचा : Aaditya Thackeray लोकसभा निवडणूक लढवणार?, India Today Conclave मध्ये सांगितला प्लॅन

दरम्यान इतकं वजन वाढल्यानंतर मी डायटीशनचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला. पण मला माहिती होतं, डाएट स्वत: पाळली तरच होते, कुणाच्या सांगण्यावरून होत नाही. त्यामुळे मी स्वत:च वेट लॉसबाबत रीसर्च करायला सुरूवात केली.बेसीक पद्धतीत वजन कमी करायला सुरूवात केली. जंक फूड, प्रोसेस्ड फुड खाणं टाळलं, तसेच घरातलं जेवण आणि फायबरयुक्त अन्न खायला सुरूवात केली. त्यामुळे आता माझं वजन 56 किलोवर आले आहे.

हे वाचलं का?

वडिलांना गमावल्यानंतर त्वरिताची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्याचसोबत वडिलांच्या निधनाने तिला मोठा हादरा बसला होता. त्यामुळे जास्तच मेंटल स्ट्रेस घेतल्याने त्यांच वजन वाढलं होतं. या सर्व गोष्टीतून बाहेर पडल्यानंतर त्वरिताने ज्यावेळेस पुन्हा काम करायला सुरूवात केली. त्यावेळेस तिला तिच्या वजनावरून सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. या जाडीला व्हि़ड़िओत कुणी घेतलं?, वजन कसं वाढलं ?, जाडी का झालीस? असे अनेक सवाल सोशल मीडियावर विचारले गेले. त्यानंतर त्वरिताने या गोष्टी खूप गांभिर्याने घेत वजन घटवण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा : Nallasopara : ‘डॉन को पकडना…’, अमिताभचा डायलॉग मारला अन् पोलिसांनी मुसक्या आवळल्या, नेमकं काय घडलं?

डाएट प्लान काय?

त्वरिताने ज्याप्रमाणे 12 किलो वजन घटवलं आहे, त्यानुसार ती कोणता डाएट प्लान घ्यायची, हे जाणून घ्यायला तिचे फॅन्स उत्सुक आहेत. मी रोज सकाळी उठून गरम पाणी पिते. त्यानंतर एक मुठ्ठी ड्रायफुट्स खाते. काही तासानंतर मग एक कप क़ॉफी पिते. यानंतर जर भूक लागली तर टोफू सँडविच खाते. जर त्वरिताने वर्कआऊट केला असेल तर ती त्या दिवशी प्रोटीन शेक पिते आणि त्यानंतर जेवण करते. मला डाळ-खिचडी खायला खुप आवडते.रोज रात्री हाच आहार घेणे ती पसंद करते.

ADVERTISEMENT

त्वरिता तिच्या फिटनेसबद्दल पुढे सांगते की, मी आता पर्सनल ट्रेनरच्या अंडर व्यायामाला सुरूवात केली आहे. योगा, वेट ट्रेनिंग, कार्डिओ, हाय इंटर्सिटी वर्कआऊट रूटीन देखील सामील आहे. मी कधी माझे डांन्स क्लास मिस करत नाही, दररोज 1 तास तरी क्लासला जातेच. आणि आठवड्याच्या तीन दिवस धावायला जाते, असे त्वरिता सांगते. यामुळेच त्वरिताने फॅट टू फिट जर्नी पुर्ण केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT