Elvish Yadav : कोब्राचं विष, तरुणी, रेव्ह पार्ट्या अन् एल्विश, वाचा Inside Story

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

DCP Vishal Pandey of Noida Police said that the search is on for Alvish Yadav because the accused have told that Alvish had given the number of Rahul, who organizes such rave parties.
DCP Vishal Pandey of Noida Police said that the search is on for Alvish Yadav because the accused have told that Alvish had given the number of Rahul, who organizes such rave parties.
social share
google news

elvish yadav Fir : नोएडामधील रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादवचा तीन राज्यांमध्ये शोध घेत आहेत. नोएडा पोलीस एल्विशशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत.

ADVERTISEMENT

सव्‍‌र्हॉन बँक्वेट हॉलमध्ये सापडलेल्या सापाच्या विषाची पोलीस चौकशी करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून 9 वेगवेगळे साप आणि 20ML विष जप्त केले असून पाच जणांना अटक केली आहे.

एल्विश यादवचा शोध सुरू : डीसीपी

नोएडा पोलीस उपायुक्त विशाल पांडे यांनी सांगितले की, अल्विश यादवचा शोध सुरू आहे; कारण आरोपींनी सांगितले की अल्विशने राहुलचा नंबर दिला होता, जो अशा रेव्ह पार्ट्या आयोजित करतो. दरम्यान, एल्विश यादवने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्याने मी निर्दोष असल्याचे म्हटले आहे.

हे वाचलं का?

एल्विशने काय केला खुलासा

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि पोलिसांकडून शोध घेतला जात असताना एल्विश यादवने खुलासा केला आहे. सर्व आरोप निराधार असल्याचे एल्विशने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. सर्व आरोप खोटे असून त्यात एक टक्काही तथ्य नाही. माझे नाव खराब करू नका आणि मी उत्तर प्रदेश पोलिसांना सहकार्य करण्यास तयार आहे, असे तो म्हणाला आहे. माझ्यावरचे एक टक्काही आरोप सिद्ध झाले तर त्याची जबाबदारी मी घेईन. याप्रकरणी एल्विश यादवने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडेही दाद मागितली आहे.

हे ही वाचा >> घरच आहे 14 कोटींचं, एल्विश यादवची महिन्याची कमाई किती?

ADVERTISEMENT

2 नोव्हेंबर रोजी नोएडा पोलिसांनी सेक्टर 49 परिसरात छापा टाकून 5 लोकांना अटक केली होती आणि त्यांच्याकडून 5 कोब्रासह एकूण 9 साप जप्त केले होते. पोलिसांनी पार्टीच्या ठिकाणाहून सापाचे विष, पाच कोब्रा, एक अजगर, दोन लांब शेपटी साप आणि एक घोड्याच्या शेपटीचा साप जप्त केला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींची चौकशी केली असता त्यांनी एल्विश यादवचे नाव घेतले.

ADVERTISEMENT

आरोपींनी एल्विशबद्दल काय सांगितले?

आरोपींनी चौकशीदरम्यान सांगितले की, ते एल्विश यादवच्या पार्टीत साप पुरवायचे. यानंतर आता पोलिसांनी एल्विशविरोधातही एफआयआर नोंदवला आहे. ही बाब वन्यजीव संरक्षणाशी संबंधित आहे. अहवालानुसार, जप्त केलेल्या सापांची खरेदी-विक्री करण्यास मनाई आहे आणि या प्रकरणात लावण्यात आलेली कलमे अजामीनपात्र आहेत. आता एल्विशविरोधात सबळ पुरावे मिळाल्यास त्याची अटक निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा >> Manoj Jarange : CM शिंदे म्हणाले, ‘सरसकट नाही’, जरांगेंनी गोंधळ केला दूर

पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, एल्विश यादव इतर यूट्यूबर्ससह नोएडा-एनसीआरच्या फार्म हाऊसमध्ये सापाचे विष आणि जिवंत सापांसह पार्ट्यांचे आयोजन करायचे आणि तेथे व्हिडिओ शूट करायचे. मिळालेल्या माहितीनुसार, अशा पार्ट्यांमध्ये परदेशी मुलींनाही बोलावून सापाच्या विषासह इतर नशा केली जात होती.

या बँक्वेट हॉलमधून आरोपींना पकडण्यात आले

माहितीवरून एका पोलीस खबऱ्याने हे प्रकरण उघड करण्यासाठी एल्विश यादव यांच्याशी संपर्क साधला. त्याला नोएडा येथील रेव्ह पार्टीमध्ये साप आणि कोब्राच्या विषाची व्यवस्था करण्यास सांगितले. यावर एल्विश यादव याने एजंट राहुलचे नाव सांगून त्याचा मोबाईल नंबर दिला व माझे नाव घेऊन फोन करा काम होईल असे सांगितले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT