मोठी बातमी : प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Rajendra Prasad Daughter Gayatri Dies
Rajendra Prasad Daughter Gayatri Dies
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सिनेविश्वातून अत्यंत दुख:द बातमी समोर आली आहे.

point

लोकप्रीय अभिनेत्याच्या मुलीनं 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

point

राजेंद्र प्रसाद चित्रपटाच्या शुटिंगसाठी सेटवर होते, त्याचदरम्यान...

Veteran Actor Rajendra Prasads Daughter Gayatri Dies : सिनेविश्वातून अत्यंत दुख:द बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते राजेंद्र प्रसाद यांची मुलगी गायत्रीचं (38)हृदय विकाराच्या झटक्यामुळे निधन झालं.  छातीत त्रास होऊ लागल्याने गायत्रीला हैदराबादच्या कॉर्पोरेट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान गायत्रीचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण सिनेविश्वात शोककळा पसरली आहे.

हे ही वाचा >> Jayant Patil: 'दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खूर्ची लाडकी...', लाडकी बहीण योजनेबाबत जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

मिळालेल्या माहितीनुसार, गायत्रीचे वडील अभिनेते राजेंद्र प्रसाद चित्रपटाच्या शुटिंगसाठी सेटवर होते. त्याचदरम्यान गायत्रीचा मृत्यू झाल्याचं त्यांना कळलं. आज हैदराबादमध्ये गायत्रीवर अंत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. गायत्रीच्या जाण्यानं राजेंद्र प्रसाद यांच्या कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. प्रसाद यांच्या पश्चात एक मुलगा आणि मुलगी आहे. गायत्रीचं लग्न झाल्यानंतर तिच्याशी खूप दिवसांपासून बोलणं झालं नव्हतं. आमच्या दोघांमध्ये खूप चांगली बॉण्डिंग होती, असं प्रसाद यांनी म्हटलंय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT