Shyam Benegal Passes Away: ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन, वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Shyam Benegal Passes Away: ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे वयाच्य ९० व्या वर्षी निधन झाले. त्यांनी झुबैदा, अंकुर सारखे चित्रपट दिग्दर्शित केले होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन

वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

झुबैदा, अंकुर सारखे केले होते चित्रपट दिग्दर्शित
मुंबई: चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन झाले आहे. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्याम बेनेगल हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. श्याम बेनेगल दीर्घकाळ आजारी होते. त्यांची कन्या पिया बेनेगल यांनी इंडिया टुडेला या बातमीची पुष्टी केली. बेनेगल यांना भारत सरकारने 1976 मध्ये पद्मश्री आणि 1991 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या यशस्वी चित्रपटांमध्ये मंथन, जुबैदा आणि सरदारी बेगम यांचा समावेश आहे.
ज्येष्ठ दिग्दर्शकाचे श्याम बेनेगल यांची कारकीर्द
श्याम बेनेगल यांनी या जगाचा निरोप घेणे ही संपूर्ण उद्योगासाठी मोठी हानी आहे. नुकताच त्यांनी ९० वा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्री शबाना आझमीने तिच्या इंस्टाग्रामवर या पार्टीचे फोटो शेअर केले होते. फोटोमध्ये श्याम बेनेगल, शबाना आणि नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत हास्य विनोद करताना पाहायला मिळाले होते.
चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन न मानता त्यातून प्रेक्षकांची अंर्तदृष्टी विकसित करणारा विचार दिला पाहिजे. अशी बांधिलकी मानणाऱ्या दिग्दर्शकात त्यांना मानाचे स्थान आहे.
श्याम बेनेगल यांचे पूर्ण नाव श्यामसुंदर श्रीधर बेनेगल असे आहे. त्यांचा जन्म हैद्राबाद मध्ये त्रिमुलागिरी येथे झाला. त्यांचे वडील श्रीधर बेनेगल स्वतः एक छायाचित्रकार होते. लहानपणापासूनच श्याम बेनेगल यांना चित्रपट पाहाण्याची खूप आवड होती. त्यांच्या या छंदाला कुटुंबियांनीही प्रोत्साहन दिले. त्याकाळी प्रभात, मेहबूब आणि न्यू थिएटर्स सारख्या स्टुडिओंनी निर्माण केलेले चित्रपट त्यांच्या कुटुंबातील सारे सदस्य आवडीने पहात असत. त्यामुळे बालवयातच त्यांनी चित्रपट क्षेत्राचा ध्यास घेतला.