Vikas Sethi Death Reason : विकास सेठी यांची प्राणज्योत मालवली! निधनाचं कारण काय?
Vikas Sethi Death News : 'कसौटी जिंदगी की' आणि 'क्योंकी सास भी कभी बहू थी' फेम अभिनेता विकास सेठी यांच निधन झालं आहे. वयाच्या 48 व्या वर्षी सेठी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. झोपेतच असताना सेठी यांची प्राणज्योत मालवली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
रविवारचा दिवस मनोरंजन विश्वासाठी खूप दु:खदायक
विकास सेठी यांच्या निधनामुळं फिल्म इंडस्ट्री शोकाकूल
वयाच्या 48 व्या वर्षी विकास सेठी यांनी घेतला अखेरचा श्वास
Vikas Sethi Death News : 'कसौटी जिंदगी की' आणि 'क्योंकी सास भी कभी बहू थी' फेम अभिनेता विकास सेठी यांच निधन झालं आहे. वयाच्या 48 व्या वर्षी सेठी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. झोपेतच असताना सेठी यांची प्राणज्योत मालवली.48 वर्षांचं असताना या अभिनेत्यानं जगाचा निरोप घेतला आहे. झोपतच विकास सेठी यांचं निधन झालं. सेठी आर्थिक विवंचनेमुळं नैराश्यात होते, असं बोललं जात आहे. विकास सेठी यांच्या पश्चात दोन मुलं आहेत. सेठी यांच्या मृत्यूमुळं संपूर्ण बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वात शोककळा पसरली आहे.
रविवारचा दिवस चाहत्यांसाठी खूप दु:खदायक
प्रसिद्ध अभिनेता विकास सेठी यांच्या निधन झाल्यानं संपूर्ण फिल्म इंड्रस्ट्रित शोककळा पसरली आहे. सेठी झोपेतच होते, पण सकाळी ते जागेच झाले नाहीत. त्यामुळे सेठींना त्यांच्या पत्नीनं आनन फानन रुग्णालयात दाखल केलं. परंतु, डॉक्टरांनी सेठी यांना मृत घोषित केलं.
हे ही वाचा >> Optical Illusion : मास्टरमाईंड झाले फेल! कुणालाच दिसला नाही फोटोत लपलेला घुबड, 5 सेकंदात शोधून दाखवा
आर्थिक विवंचनेतून आलं होतं नैराश्य
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास सेठी गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करत होते. खूप दिवसांपासून त्यांना काम मिळत नव्हतं. ते इंडस्ट्रितील अनेक मित्रांच्या संपर्कात नव्हते. टेलिव्हिजन शो व्यतिरिक्त विकास सेठी यांनी करण जोहर यांच्या कभी खुशी कभी गम या चित्रपटात रॉकीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांची भूमिका लोकप्रिय झाली होती.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
या शोज मध्ये केलंय काम
विकास सेठी 90 च्या दशकाती लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांनी कहीं तो होगा, ससुराल सिमर का, गुस्ताख दिल आणि उतरन सारखे अनेक लोकप्रिय शोमध्ये काम केलं होतं. 2018 मध्ये त्यांचा विवाह जान्हवीसोबत झाला होता. त्यांना दोन मुलं (Twins) आहेत. ते सोशल मीडियावर खूप सक्रिय होते. त्यांनी पत्नी आणि मुलांसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. परंतु, मागील चार महिन्यांपासून त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली नाही. पैशांच्या नैराश्यामुळं त्यांना हृदयविकाराचा झटका आला, असं सांगितलं जात आहे. परंतु, त्यांच्या निधनाबाबत कुटुंबीयांकडून अधिकृत माहिती समोर आली नाहीय.
हे ही वाचा>> Viral Video: जीव वाचवण्यासाठी कुत्र्याने पायाला घट्ट धरलं, पण तरुणाने गाठला क्रुरतेचा कळस!
ADVERTISEMENT