Smita Patil यांनी नॅशनल अवॉर्डच्या रकमेचं काय केलं? गाजलेल्या किस्स्याची वाचा खास Inside Story
विचार करा, एका राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेल्या अभिनेत्रीला जिथे तिचा चित्रपट दाखवला जाणार आहे त्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाण्यापासून रोखलं तर? कारण ती अभिनेत्रीसारखी दिसत नव्हती. ही घटना स्मिता पाटील यांच्यासोबत खरंच घडली होती. त्यांच्या सावळ्या रंगाने त्यांनी भारतीय सिनेविश्वात यश मिळवले, पण समाजाचे पूर्वग्रह बदलू शकल्या नाहीत.
ADVERTISEMENT

Smita Patil untold Story : विचार करा, एका राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेल्या अभिनेत्रीला जिथे तिचा चित्रपट दाखवला जाणार आहे त्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाण्यापासून रोखलं तर? कारण ती अभिनेत्रीसारखी दिसत नव्हती. ही घटना स्मिता पाटील यांच्यासोबत खरंच घडली होती. त्यांच्या सावळ्या रंगाने त्यांनी भारतीय सिनेविश्वात यश मिळवले, पण समाजाचे पूर्वग्रह बदलू शकल्या नाहीत. (What did Smita Patil do with the National Award money Know the special Inside Story about her)
मैथिली राव यांनी स्मिता पाटील यांचं चरित्र ‘स्मिता पाटील अ ब्रीफ इन्कॅन्डेसेन्स’ मध्ये अनिता पाटील यांच्या सांगण्यानुसार फिल्म फेस्टिव्हलमधील एक किस्सा लिहिला आहे.
वाचा : धक्कादायक! सख्ख्या बहिणीला वेश्या म्हणून विकलं, तीन मुलं असलेल्या पुरूषाकडेच..
अनिता पाटील, स्मिता पाटील यांची बहीण आहे. त्या म्हणतात, “ही 1980 च्या दशकाच्या सुरुवातीची गोष्ट आहे. मी, स्मिता आणि पूनम धिल्लन दिल्ली फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी आलो होतो. तिथे पोहोचल्यावर आम्हाला आठवले की आम्ही आमच्या डेलीगेट्सचा बॅच विसरलो होतो. यावेळी तिथल्या सिक्युरिटींनी पूनमला आत जाऊ दिलं पण स्मिताला नाही कारण ती फिल्म स्टारसारखी दिसत नव्हती.”
स्मिता पाटील यांना 1977 मध्ये ‘भूमिका’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. चित्रपट महोत्सवात त्यांचा ‘चक्र’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, तेथे त्यांना उपस्थित राहण्यापासून रोखण्यात आले. स्मिता पाटील यांना 1981 मध्ये चक्रसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.