Rajinikanth Yogi Adityanath : रजनीकांत आदित्यनाथांच्या पाया का पडले? अखेर उत्तर मिळालं

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Rajinikanth was trolled a lot for touching the feet of CM Yogi. Looking at the age gap between the two, the users did not mind touching Rajinikanth's feet.
Rajinikanth was trolled a lot for touching the feet of CM Yogi. Looking at the age gap between the two, the users did not mind touching Rajinikanth's feet.
social share
google news

Rajinikanth Yogi Adityanath news in marathi : सुपरस्टार रजनीकांत हे गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहेत. रजनीकांत त्यांच्या जेलर चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान लखनऊला होते. जिथे त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. भेटीवेळी ते योगींच्या पाया पडले. ही गोष्ट सोशल मीडिया युजर्संना आवडली नाही आणि रजनीकांत खूप ट्रोल झाले. पण, आता रजनीकांत यांनी या प्रकरणावर मौन तोडले आहे. (Why did Rajinikanth touch CM Yogi’s feet?)

ADVERTISEMENT

सीएम योगींच्या पायांना स्पर्श केल्यामुळे रजनीकांत यांना खूप ट्रोल करण्यात आले. दोघांमधील वयातील अंतर पाहता युजर्संनी रजनीकांत यांनी पाया पडणे आवडले नाही. सीएम योगी त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत, त्यामुळे त्यांच्या पाया पडायला नको होते, अशा आशयाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या.

रजनीकांत यांनी सांगितले कारण

आता या संपूर्ण प्रकरणावर रजनीकांत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नुकतेच रजनीकांत चेन्नई विमानतळावर दिसले आणि पत्रकारांनी त्यांना घेरले. यादरम्यान त्यांना ट्रोलिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना रजनीकांत म्हणाले की, ‘त्यांची ही एक सवय आहे. ते साधू असो वा योगी… माझ्यापेक्षा वयाने लहान असले तरीही त्यांच्या पाया पडणे ही माझी सवय आहे.’

हे वाचलं का?

सीएम योगींच्या पायाला स्पर्श केल्याने झाले ट्रोल

बद्रीनाथांचे दर्शन घेतल्यानंतर रजनीकांत थेट लखनौला पोहोचले. तेथे त्यांनी प्रथम उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची भेट घेतली. यादरम्यान मंत्र्यांसाठी रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंगही आयोजित करण्यात आले होते. दुपारी दीड वाजता दोघांनी एकत्र बसून चित्रपट पाहिला. लखनऊच्या फिनिक्स प्लासिओच्या आयनॉक्स मेगाप्लेक्समध्ये सर्वांनी हा चित्रपट पाहिला.

वाचा >> Aziz Qureshi : ‘एक-दोन कोटी मुस्लिम मेले तरी हरकत नाही’, काँग्रेस नेत्याचं विधान

यानंतर रजनीकांत थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये रजनीकांत आपल्या कारमधून खाली उतरले आणि थेट सीएम योगींना भेटले आणि त्यांच्या पायाला हात लावताना दिसले. सीएम योगी यांनी रजनीकांत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पूर्ण आदराने त्यांना घरात नेले. यावेळी रजनीकांत यांच्यासोबत त्यांची पत्नी लताही उपस्थित होती.

ADVERTISEMENT

वाचा >> Amol Kolhe : ‘…तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही’, कोल्हेंचा फडणवीसांना इशारा

रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, तर तो चांगली कमाई करत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जेलरने पहिल्या दिवशी 48.35 कोटींची कमाई केली होती. त्याची क्रेझ चाहत्यांमध्ये अजूनही आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT