Rave Party : त्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी; आर्यन खानच्या अटकेवर सुनील शेट्टीचं मत
मुंबईच्या समुद्रात सुरु असलेल्या रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. एनसीबीने रेव्ह पार्टीवर टाकलेल्या धाडीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही आढळून आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या आर्यन खानची चौकशी सुरु आहे. आर्यन खान पार्टीत सापडल्यानं शाहरूख खानवरही टीका होत असून याबद्दल अभिनेता सुनील शेट्टीला एका कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला. […]
ADVERTISEMENT

मुंबईच्या समुद्रात सुरु असलेल्या रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. एनसीबीने रेव्ह पार्टीवर टाकलेल्या धाडीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही आढळून आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या आर्यन खानची चौकशी सुरु आहे. आर्यन खान पार्टीत सापडल्यानं शाहरूख खानवरही टीका होत असून याबद्दल अभिनेता सुनील शेट्टीला एका कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला.
मुंबई आणि बॉलिवूडमध्ये रविवारी खळबळ उडाली. ‘एनसीबी’ने मुंबईहून गोव्याला जात असलेल्या क्रूझ जहाजात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर शनिवारी धाड टाकली. शनिवारी रात्री ही माहिती समोर आली. त्यानंतर रविवारी सकाळी आर्यन खान यालाही ताब्यात घेण्यात आल्याची माहितीने सगळीकडे पसरली. आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर आणि शाहरुख खानवर टीका केली जात आहे.
सर्वत्र या प्रकरणाची चर्चा होत असताना अभिनेता सुनील शेट्टीला एका कार्यक्रमात आर्यन खानबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुनील शेट्टीने संयम बाळगण्याचं आणि जबाबदारीनं वागण्याचं आवाहन केलं.
सुनील शेट्टी म्हणाला, ‘मी म्हणने की, जेव्हा केव्हा धाड पडते. तिथे अनेक लोकांना पकडलं जातं आणि आपण असा समज करून घेतो की, त्या मुलानं ड्रग्जचं सेवन केलं असेल किंवा या मुलानं ड्रग्ज घेतलंच असेल. पण, कार्यवाही सुरू आहे. त्या मुलाला श्वास तरी घेऊ द्या’, असं मत सुनील शेट्टीनं मांडलं.










