Tunisha Sharma Suicide case latest update : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री (Tv actress) तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक आणि खळबळ उडवून देणारी घटना शनिवारी (24 डिसेंबर) घडली. आत्महत्या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं, जेव्हा पोलिसांनी तिचा सह कलाकार आणि एक्स बॉयफ्रेंड शीजान मोहम्मद खान (sheezan mohammad khan) याला अटक केली. (sheezan mohammad khan arrested by mumbai police in Tunisha Sharma Suicide case)
टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरणाने मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडालीये. शनिवारी (24 डिसेंबर) तुनिषा शर्माने शुटिंग सेट वरच गळफास घेऊन आयुष्य संपवलं. मेकअप रुममध्ये तिचा मृतदेह टांगलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणात तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आईने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केलीये.
'अली बाबा दास्तान ए काबुल अली' (ali baba dastaan-e-kabul) मालिकेतील सह कलाकार आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड शीजान मोहम्मद खान (sheezan mohammad khan) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शीजान मोहम्मद खान (sheezan mohammad khan) याला अटक करण्यात आलीये.
छोट्या पडद्यावरील नावाजलेली अभिनेत्री तुनिषा शर्मा ही सह कलाकार शीजान मोहम्मद खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. समोर आलेल्या माहितीनुसार शीजान मोहम्मद खानने तुनिषा शर्मासोबत ब्रेकअप केलं होतं. त्यामुळे ती काही दिवसांपासून तणावाखाली होती.
तिच्या आईने तक्रारीत आरोप केलाय की, 'तुनिषा शर्माचे (वय 24) तिचा सह कलाकार शीजान मोहम्मद खान यांच्याबरोबर प्रेमसंबंध होते. परंतु 15 दिवसांपूर्वी शीजानने तुनिषा शर्मासोबत ब्रेकअप केलं. तिला सोडून दिल्यामुळे तुनिषा शर्मा नैराश्यामध्ये होती. त्याच कारणामुळे तुनिषाने नायगाव कामण येथील सेटवरील रेस्ट रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.'
मुंबई पोलिसांनी तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) हिचा सह कलाकार शीजान मोहम्मद खान याच्याविरुद्ध वाळीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर शीजान मोहम्मद खानला अटक करण्यात आली. शीजान मोहम्मद खानविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 306 नुसार (आत्महत्येस प्रवृत्त करणं) एफआयआर दाखल केला.
या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार तुनिषा शर्माला पॅनिक अटॅक आला होता. त्यानंतर तिने डॉक्टरला दाखवलं होतं. डॉक्टरने तुनिषाच्या आईला तिची मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याचं आणि तिच्या डोक्यात आत्महत्येचे विचार येत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता तिच्या आईने शीजान मोहम्मद खानवर आरोप केले आहेत.
तुनिषा शर्माचे पार्थिव जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आलेले आहे. त्यानंतर 25 डिसेंबर रोजी मुंबईतील मीरा रोड स्थित स्मशानभूमीत तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) हिच्या पार्थिवावर सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.