
Urfi Javed Controvarisal Statement: मुंबई: अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही सध्या प्रचंड चर्चेत आहे. भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या टार्गेटवर ती आल्याने तिच्याबाबत चर्चेला बरंच उधाण आलं आहे. उर्फी ही जेवढ्या बिनधास्तपणे आपली स्टाइल फॉलो करते तेवढ्याच बोल्डपणे आता तिनं विधानं करणं सुरू केलं आहे. आपल्या ड्रेसिंग सेन्सने इंटरनेटवर खळबळ माजवणारी उर्फी पुन्हा आता तिच्या एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. (urfi javed controvarisal statement her attitude did not change even after the police case)
उर्फी ज्या पद्धतीने कपडे परिधान करते त्यावरुन तिला बरंच ट्रोल केलं जातं. पण भाजपच्या महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा किशोर वाघ यांनी उर्फी जावेदविरोधात अश्लील वर्तन केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला गंभीर वळण लागलं आहे. असं असताना उर्फी ही पुन्हा एकदा बरळली आहे. ज्यामुळे तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
उर्फी जावेद ही मुंबईच्या रस्त्यांवर अतिशय तोकड्या कपड्यांमध्ये अनेकदा फोटोशूट करताना दिसली आहे. उर्फी नेहमीच तिच्या आउटफिट्समध्ये विचित्र प्रयोग करत असते. यामुळेच आता तिच्या विरोधात पोलिसात तक्रारही दाखल झाली आहे. असं असताना आता तिने आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे.
उर्फी ही आज (5 डिसेंबर) मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. त्यावेळी तिला पत्रकारांनी विचारलं की, 'तुझ्या चाहत्यांना काय सांगशील, जे तुझ्यावर प्रेम करतात?" त्यावर उत्तर देताना उर्फी जावेद म्हणाली की, 'प्रेमाचं तर माहित नाही, परंतु माझा नंगानाच असाच चालू राहील.' यानंतर ती हसायला लागली आणि फ्लाइंग किस देत निघून गेली.
भाजपच्या महाराष्ट्र महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदविरोधात तक्रार दाखल केली आहे. उर्फी जावेदच्या अटकेची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. त्यांनी उर्फी जावेदवर मुंबईच्या रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लीलत पसरवत असल्याचा आरोप केला आहे. चित्रा वाघ यांनीही मुंबई पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्था विभागाच्या उपायुक्तांची भेट घेऊन मुंबईतील रस्त्यावर अंगप्रदर्शन करणाऱ्या उर्फी जावेदवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
नुकताच उर्फी जावेदचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती जीन्ससोबत ब्लॅक कटआउट टॉपमध्ये दिसली. चित्रा वाघ यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर गा व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले, 'मुंबईत काय चालले आहे? मुंबईच्या रस्त्यावर खुलेआम नंगानाच करणाऱ्या या महिलेला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडे आयपीसी/सीआरपीसी कलम आहे का? तिला (उर्फी) लवकरात लवकर अटक करा.'
उर्फीने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, 'मला माहित आहे की राजकारण्यांविरुद्ध कोणताही मजकूर अपलोड करणे खूप धोकादायक आहे, परंतु तरीही हे लोक मला बोलण्यास भाग पाडत आहेत. पण मी, हे सुरू केलेलं नाही, मी कधीही कोणाचेही वाईट केले नाही. ते विनाकारण माझ्याविरोधात बोलत आहेत.'
याशिवाय उर्फीने मंत्री संजय राठोडांवरुन देखील चित्रा वाघांवर निशाणा साधला होता. तुम्हाला संजय राठोड आठवतोय का? असा सवाल विचारत उर्फीने चित्रा वाघ यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता.