Elvish Yadav : कोब्राचं विष, तरुणी, रेव्ह पार्ट्या अन् एल्विश, वाचा Inside Story
Elvish Yadav News in Marathi : एल्विश यादवचा मोठ्या प्रकरणात अडकला आहे. कोब्रा सापांची तस्करी, नागाच्या विषाची नशा आणि परदेशी तरुणींच्या रेव्ह पार्ट्या आयोजित केल्याच्या आरोपात त्याच्या गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ADVERTISEMENT

elvish yadav Fir : नोएडामधील रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादवचा तीन राज्यांमध्ये शोध घेत आहेत. नोएडा पोलीस एल्विशशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत.
सव्र्हॉन बँक्वेट हॉलमध्ये सापडलेल्या सापाच्या विषाची पोलीस चौकशी करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून 9 वेगवेगळे साप आणि 20ML विष जप्त केले असून पाच जणांना अटक केली आहे.
एल्विश यादवचा शोध सुरू : डीसीपी
नोएडा पोलीस उपायुक्त विशाल पांडे यांनी सांगितले की, अल्विश यादवचा शोध सुरू आहे; कारण आरोपींनी सांगितले की अल्विशने राहुलचा नंबर दिला होता, जो अशा रेव्ह पार्ट्या आयोजित करतो. दरम्यान, एल्विश यादवने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्याने मी निर्दोष असल्याचे म्हटले आहे.
एल्विशने काय केला खुलासा
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि पोलिसांकडून शोध घेतला जात असताना एल्विश यादवने खुलासा केला आहे. सर्व आरोप निराधार असल्याचे एल्विशने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. सर्व आरोप खोटे असून त्यात एक टक्काही तथ्य नाही. माझे नाव खराब करू नका आणि मी उत्तर प्रदेश पोलिसांना सहकार्य करण्यास तयार आहे, असे तो म्हणाला आहे. माझ्यावरचे एक टक्काही आरोप सिद्ध झाले तर त्याची जबाबदारी मी घेईन. याप्रकरणी एल्विश यादवने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडेही दाद मागितली आहे.