Tunisha Sharma : अभिनेत्री प्रेग्नंट होती? PM मध्ये कळलं मृत्यूचं कारण

मुंबई तक

Tunisha Sharma Death reason News : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने शुटिंगनंतर मेकअप रुममध्येच स्वतःच्या आयुष्याचा शेवट केला. तुनिषाने उचलेल्या टोकाच्या पावलाने मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त होत असून, तुनिषा शर्माचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याची माहिती पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलीये. (What is the reason behind Tunisha Sharma death?) टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Tunisha Sharma Death reason News : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने शुटिंगनंतर मेकअप रुममध्येच स्वतःच्या आयुष्याचा शेवट केला. तुनिषाने उचलेल्या टोकाच्या पावलाने मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त होत असून, तुनिषा शर्माचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याची माहिती पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलीये. (What is the reason behind Tunisha Sharma death?)

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी (24 डिसेंबर) आयुष्याला कायमचा पूर्णविराम दिला. तुनिषा शर्माने सेटवरील मेकअप रुममध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. सह कलाकार शीजान मोहम्मद खानच्या मेकअप रुममध्ये तिचा मृतदेह टांगलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, हे अद्याप समोर आलेलं नसलं. तरी ती काही दिवसांपासून तणावाखाली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळालीये. तुनिषा शर्मा तिचा सह कलाकार शीजान मोहम्मद खान यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्याचं ब्रेकअप झालं होतं. त्यानंतर ती तणावाखाली होती.

Tunisha Sharma : तुनिषाच्या आईचा गंभीर आरोप, शीजान मोहम्मद खानला अटक

हे वाचलं का?

    follow whatsapp