स्वीटू आणि ओममध्ये खुलतंय मैत्रीचं गोड नातं
एका गोड नात्याची कथा सांगणारी झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेला प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला अल्पावधीतच हि मालिका लोकप्रिय झालेय, अन्विता फलटणकर आणि शाल्व किंजवडेकर ह्या फ्रेश जोडीने तरुणाईवर छाप सोडलीय. प्रत्येक पावलावर स्वीटूला मदत करणारा आणि तिच्या सोबत सावली सारखा उभा राहणारा ओम या दोघांमध्ये आता मैत्रीचं नातं बहरताना दिसतंय, ह्या […]
ADVERTISEMENT

एका गोड नात्याची कथा सांगणारी झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेला प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला अल्पावधीतच हि मालिका लोकप्रिय झालेय, अन्विता फलटणकर आणि शाल्व किंजवडेकर ह्या फ्रेश जोडीने तरुणाईवर छाप सोडलीय.
प्रत्येक पावलावर स्वीटूला मदत करणारा आणि तिच्या सोबत सावली सारखा उभा राहणारा ओम या दोघांमध्ये आता मैत्रीचं नातं बहरताना दिसतंय, ह्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर कधी होणार याचीच प्रेक्षकांना उत्सुकता लागलेय.या मालिकेची पटकथा – सुखदा आयरे, कथा विस्तार -समीर काळभोर, आणि संवाद किरण कुलकर्णी- पल्लवी करकेरा यांचे आहेत. मालिकेचे दिगदर्शक अजय मयेकर आहेत. शुभांगी गोखले,अदिती सारंगधर,दीप्ती केतकर प्रमुख भूमिकेत आहेत.