Condom शिवाय लैंगिक सुख! पुरुषांसाठी नवे गर्भनिरोधक! ICMR चे रिसॅग काय?

भागवत हिरेकर

Indian Council of Medical Research (ICMR) male contraceptive RISUG : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषेदेने पुरुषांसाठी नवे गर्भनिरोधक औषध शोधले. त्यामुळे आता कंडोमशिवाय लैंगिक सुखाचा आनंद घेता येणार आहे.

ADVERTISEMENT

what is Indian Council of Medical Research (ICMR) male contraceptive RISUG
what is Indian Council of Medical Research (ICMR) male contraceptive RISUG
social share
google news

Male Contraceptive ICMR : गेल्या सात वर्षांपासून पुरुषांच्या गर्भनिरोधकावर संशोधन करत असलेल्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला (ICMR) मोठे यश मिळाले आहे. ICMR ला पुरुष गर्भनिरोधक RISUG सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे आढळले आहे. रिसग हे नॉन-हार्मोनल इंजेक्शनद्वारे घेता येणारे गर्भनिरोधक आहे, जे गर्भधारणा रोखण्यात यशस्वी ठरले आहे. (Indian Council of Medical Research (ICMR) male contraceptive RISUG to be safe and effective)

रिसर्चनुसार, या संशोधनात 303 पुरुष सहभागी झाले होते. असे सांगण्यात आले की पुरुषांसाठी हे पहिले यशस्वी गर्भनिरोधक इंजेक्शन आहे जे जोडीदार महिलेला गर्भधारणा होण्यापासून सुरक्षित ठेवू शकते.

संशोधन काय म्हणते?

इंटरनॅशनल ओपन ऍक्सेस जर्नल एंड्रोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या ओपन-लेबल आणि नॉन-यादृच्छिक फेज-III अभ्यासातील निष्कर्षांनुसार, 25 ते 40 वर्षे वयोगटातील 303 निरोगी, लैंगिकदृष्ट्या सक्रिय आणि विवाहित पुरुषांची कुटुंब नियोजन क्लिनिकमधून निवड करण्यात आली. ते लोक या संशोधनात सहभागी झाले होते. या लोकांना 60 मिलीग्राम रिसॅग देण्यात आले.

हेही वाचा >> Gadchiroli: सून आणि मामीने 5 जणांना कसा भरवला विषाचा घास?, मृत्यूच्या तांडवाची Inside Story

संशोधनात असे आढळून आले की, गर्भधारणा रोखण्यात Risug 99.02 टक्के यशस्वी झाले, तेही कोणत्याही दुष्परिणामांशिवाय. Risug ने 97.3% azoospermia गाठला, जो एक वैद्यकीय शब्द आहे जो सूचित करतो की स्खलित वीर्यामध्ये शुक्राणू नसतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp