लिफ्टमधून जाताना वाटते भीती? ‘हे’ नियम माहित असतील, तर राहाल टेन्शन फ्री

रोहिणी ठोंबरे

लिफ्ट बनवताना तांत्रिक बिघाड, काळजी न घेणे किंवा मानकांचे पालन न करणे ही अनेक कारणं आहेत ज्याचा लिफ्ट यूजर्सना अनेकदा मोठा फटका बसतो. दिल्लीतील ग्रेटर नोएडात शुक्रवारी (15 सप्टेंबर) एक मोठी दुर्घटना घडली. येथे बांधकाम सुरू असलेली लिफ्ट कोसळून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Lift Accident Cases : दिल्लीतील ग्रेटर नोएडात शुक्रवारी (15 सप्टेंबर) एक मोठी दुर्घटना घडली. येथे बांधकाम सुरू असलेली लिफ्ट कोसळून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. लिफ्टमध्ये एकूण 9 जण होते. तर यातील 5 जण जखमी झाले आहेत. बांधकामाधीन इमारत आम्रपाली ग्रुपची आहे, ती NBCC (National Building Construction Corporation) ने ताब्यात घेतली आहे. अपघातानंतर इमारत सील करण्यात आली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झाले होते. यापूर्वी 11 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात, एका बांधकामाधीन इमारतीची लिफ्ट कोसळली होती ज्यात 7 जणांचा मृत्यू झाला होता. (Lift Norms Government Rules National Building Code Security Feature Maintanance Explained)

या केवळ बांधकामाधीन इमारतींमधील लिफ्ट कोसळण्याशी संबंधित घटना नाही आहेत. तर, घरगुती लिफ्टपासून व्यावसायिक इमारतीतील लिफ्ट कोसळल्याच्या अशा बऱ्याच घटना आहेत.

Mumbai : घरात भांडण झालं अन् पब्लिक टॉयलेटमध्ये घेतला गळफास, अंधेरीतील घटना

लिफ्ट बनवताना तांत्रिक बिघाड, काळजी न घेणे किंवा मानकांचे पालन न करणे ही अनेक कारणं आहेत ज्याचा लिफ्ट यूजर्सना अनेकदा मोठा फटका बसतो. ऑगस्ट 2023 मध्ये जाहीर झालेल्या सर्वेक्षण अहवालानुसार, देशातील 76 टक्के लोकांकडे लिफ्ट केअरसाठी अनिवार्य मानके आहेत. ऑनलाइन कम्युनिटी प्लॅटफॉर्म LocalCircles च्या अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांत लिफ्ट वापरणाऱ्या प्रत्येक सहा जणांपैकी त्यांच्या कुटुंबातील किमान एक तरी सदस्य लिफ्टमध्ये अडकला आहे.

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) 14665 भाग 2 मधील सेक्शन 1, 2 आणि देशाचा नॅशनल बिल्डिंग कोड (NBC) 2016 अंतर्गत, इमारतींमध्ये लिफ्टची स्थापना आणि ऑपरेशनसाठी काही नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत. लिफ्ट बसवण्याबाबत भारतीय मानक ब्युरो किंवा नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. काय आहेत हे नियम, थोडक्यात जाणून घेऊयात.

हे वाचलं का?

    follow whatsapp