Rajiv Gandhi Life Story: व्हायचं होतं पायलट, पण बनले पंतप्रधान; कशी झाली होती राजकारणात एन्ट्री?
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबईत झाला. त्यांनी वयाच्या 40 व्या वर्षी देशाची सूत्रे हाती घेतली आणि देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा मान मिळवला. पायलट बनू इच्छिणाऱ्या राजीव गांधींनी राजकारणात कशी एन्ट्री केली आणि पंतप्रधान म्हणून कोणत्या कामगिरीसाठी ते आजही स्मरणात आहेत हे आज आपण जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT

Rajiv Gandhi : माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबईत झाला. त्यांनी वयाच्या 40 व्या वर्षी देशाची सूत्रे हाती घेतली आणि देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा मान मिळवला. काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांनी त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त लडाखमधील पॅंगॉन्ग तलावाच्या काठावर त्यांना आदरांजली वाहिली. पायलट बनू इच्छिणाऱ्या राजीव गांधींनी राजकारणात कशी एन्ट्री केली आणि पंतप्रधान म्हणून कोणत्या कामगिरीसाठी ते आजही स्मरणात आहेत हे आज आपण जाणून घेऊयात. (Rajiv Gandhi wanted to be a pilot but became prime minister How was the entry in politics)
राजीव गांधींचं बालपण कसं आणि कुठे गेलं?
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचा मुलगा राजीव यांचे नाव त्यांचे आजोबा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या आजी कमला नेहरू यांच्या नावावरून ठेवले होते. कमला म्हणजे कमळाच्या फुलावर विराजमान असलेली देवी लक्ष्मी आणि राजीव हा कमलचा समानार्थी शब्द आहे. राजीव गांधी यांचे बालपण तीन मूर्ती भवनात गेले. त्यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर, ते काही काळ डेहराडूनमधील वेल्हॅम शाळेत शिकले पण नंतर त्यांना हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या निवासी दून शाळेत पाठवण्यात आले.
Dilip walse Patil : ‘बरे झाले मनातील विष बाहेर पडतेय’, जितेंद्र आव्हाड भडकले
तिथे राजीव गांधींनी अनेक मित्र बनवले. पुढे त्यांचे धाकटे भाऊ संजय गांधी यांनाही त्याच शाळेत पाठवण्यात आले जिथे दोघे एकत्र शिकले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजीव गांधी पुढील शिक्षणासाठी ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज येथे गेले. त्यांनी नंतर ट्रिनिटी कॉलेजचा निरोप घेतला आणि इम्पीरियल कॉलेज, लंडन येथे गेले, तिथून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.
राजीव गांधी आणि सोनिया गांधींची पहिली भेट कशी झाली?
राजीव गांधी केंब्रिजमध्ये शिकत होते, त्याचवेळी त्यांची सोनिया गांधी यांच्याशी भेट झाली. सोनिया गांधी मूळच्या इटालियन विद्यार्थिनी होत्या आणि त्यावेळी त्या केंब्रिजमध्ये इंग्रजी शिकत होत्या. दोघांनी एकमेकांना तीन वर्ष डेट केलं आणि नंतर दोघेही भारतात आले तेव्हा सोनिया गांधी अमिताभ बच्चन यांच्या वडिलांच्या घरी राहिल्या.