10 January 2025 Horoscope In Marathi: 'या' राशीच्या लोकांना उद्योगधंद्यात होईल मोठा नफा! तर काहींना ठेवावं लागेल खर्चावर नियंत्रण
10 January 2025 Horoscope : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार एकूण 12 राशींचं वर्णन केलं जातं. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार, राशी भविष्याबाबत माहिती दिली जाते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कोणत्या राशीचे लोक होणार मालामाल?
या राशीच्या लोकांवर येईल आर्थिक संकट
कोणत्या राशीच्या लोकांना नोकरीची सुवर्ण संधी?
10 January 2025 Horoscope : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार एकूण 12 राशींचं वर्णन केलं जातं. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार, राशी भविष्याबाबत माहिती दिली जाते. 10 जानेवारी 2025 ला शुक्रवार आहे. शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीला समर्पित केला जातो. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. ज्योतिष गणनेनुसार, 10 जानेवारी 2025 (शुक्रवार) चा दिवस काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. तर काही लोकांच्या जीवनात समस्यांचा भडीमार होऊ शकतो.
मेष राशी
आज लव्ह लाईफचे भुतकाळातील विषय काढू नका. तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. विनाकारण तणावात राहू नका. स्वत:च्या गरजांकडे लक्ष द्या.
वृषभ राशी
आजच्या दिवशी जुन्या गुंतवणुकीतून चांगले रिटर्न मिळू शकतात. उद्योगधंद्यात नव्याने काम करणाऱ्यांना लाभ होऊ शकतो. आरोग्य चांगलं राहील.
मिथुन राशी
आज तुमचा दिवस खूप चांगला राहणार आहे. आर्थिकदृष्ट्या एखाद्याला मदत करावी लागेल. गुंतवणूक केल्याने फायदा होईल.










