ladki Bahin Yojana: महिलांनो! महायुतीला जिंकवणाऱ्या 'या' लाडक्या बहिणींना मिळणार 1500?

Ladki Bahin Yojana Latest Update: पुढील महिन्यात डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कमीत कमी 13 लाख नव्या महिलांना लाभ मिळण्याची शक्यता आहे.

 'लाडक्या बहिणीं'ची दिवाळी आणखी होणार गोड
'लाडक्या बहिणीं'ची दिवाळी आणखी होणार गोड
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट समोर

point

महायुती सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना देणार रिटर्न गिफ्ट?

point

पुणे जिल्ह्यातून सर्वात जास्त लाभार्थी

Ladki Bahin Yojana Latest Update: पुढील महिन्यात डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कमीत कमी 13 लाख नव्या महिलांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. ज्यांना बँक खात्याच्या आधार सीडिंगची आवश्यकता होती आणि ज्यांचं अर्ज प्रलंबीत होतं, अशा महिलांना 2.34 कोटी लाभार्थी महिलांमध्ये जोडलं जाईल. लाडकी बहीण योजनेमुळं महायुतीला बहुमत मिळाल्याचं बोललं  जात आहे. या योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारने महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद केलीय. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीला फक्त नव्या लाभार्थ्यांनाच जोडावं लागणार नाही, तर योजनेच्या माध्यमातून दरमहा 2100 रुपये देण्याचं वचनही पूर्ण करावं लागेल. दरम्यान, 1500 रुपयांच्या मागिल सबसिडीनुसार जवळपास 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. जर महायुती सरकारला त्यांचं वचन पूर्ण करायचं असेल, तर सरकारला रक्कम वाढवावी लागेल. 

हे ही वाचा >> Maharashtra CM : राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस?

पुण्यातून सर्वात जास्त लाभार्थी

महायुतीला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित मिळालं नव्हतं. त्यानंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. यामुळे सत्ताधारी पक्षांना नवीन मताधिक्य मिळण्यास मदत झाली. या योजनेचे सर्वात जास्त लाभार्थी पुणे जिल्ह्याचे आहेत. त्यानंतर नाशिक, ठाणे आणि मुंबईचा समावेश आहे.

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 LIVE: आदित्य ठाकरेंची मोठ्या पदासाठी निवड

वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटलं की, प्रलंबीत अर्ज मार्गी लावले जातील आणि महिलांना डिसेंबरपासून लाभ मिळायला हवा. सरकारी सूत्रांनी सांगितलं की, 2.34 कोटी लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी करून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले आहेत. हे 13 लाख अर्ज प्रलंबित होते आणि त्यांना डिसेंबरच्या संख्येत जोडलं जाईल. महिला आणि बाल विकास विभाग (डब्ल्यूसीडीला) लाभ वितरित करण्यासाठी कागदोपत्री कार्यवाही करावी लागेल. डब्ल्यूसीडी अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटलं की, आचारसंहिता संपल्यानंतर डिंसेंबरचं वितरण केलं जाईल. 

हे वाचलं का?

    follow whatsapp