Ladki Bahin Yojana: 5 लाख लाडक्या बहिणींना वगळलं, आता यापुढे 1 रुपयाही मिळणार नाही!

मुंबई तक

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दरमहा 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं.

ADVERTISEMENT

अर्ज मंजूर झाला पण खात्यात एकही रूपया आला नाही
अर्ज मंजूर झाला पण खात्यात एकही रूपया आला नाही
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेतून 5 लाख महिलांना का वगळलं?

point

मंत्री आदिती तटकरेंनी ट्वीटरवर दिली महत्त्वाची माहिती

point

पात्र महिलांना 2100 रुपये कधी मिळणार?

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दरमहा 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं. राज्य सरकारने मागील वर्षी जुलै महिन्यात ही योजना सुरु केल्यापासून सात हफ्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. परंतु, लाडक्या बहीण योजनेत अपात्र महिलांनीही मोठ्या प्रमाणात लाभ घेतल्याचं समोर आल्यानं सरकारने कठोर पावलं उचलली. खोटी कागदपत्रे आणि माहितीच्या आधारे ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, अशा लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी दिले होते. अशातच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्वीटरवर लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. 

मंत्री आदिती तटकरे यांचं ट्वीट जसच्या तसं

"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना..दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतून वगळण्यात येत आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे :
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला - २,३०,०००
वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला - १,१०,०००
कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला - १,६०,०००
एकुण अपात्र महिला - ५,००,०००
सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे."

हे ही वाचा >> "दिल्लीच्या जनतेनं शॉर्टकट राजकारणाचं शॉर्ट सर्किट केलं आणि...", PM नरेंद्र मोदींचा अरविंद केजरीवालांवर निशाणा!

"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तथापि, कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी", असंही आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. 

राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी प्रचारसभेत लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं होतं. महायुतीचं सरकार स्थापन झाल्यावर राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये दिले जातील, असं आश्वासन दिलं होतं. परंतु, राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतरही महिलांना अद्यापही 2100 रुपयांचा हफ्ता मिळाला नाही, त्यामुळे महायुतीने दिलेलं हे वचन कधी पूर्णत्वास लागेल आणि खात्यात ही रक्कम कधी जमा केली जाईल? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. 


 

हे वाचलं का?

    follow whatsapp