"दिल्लीच्या जनतेनं शॉर्टकट राजकारणाचं शॉर्ट सर्किट केलं आणि...", PM नरेंद्र मोदींचा अरविंद केजरीवालांवर निशाणा!

मुंबई तक

PM Narendra Modi Speech : "दिल्लीला आपदापासून मुक्त करण्याचं काम तुम्ही केलं आहे. मी दिल्लीतील प्रत्येक रहिवाशाला एक पत्र पाठवलं होतं. तुम्ही सर्वांनी प्रत्येक कुटुंबात माझं हे पत्र पोहोचवलं होतं".

ADVERTISEMENT

PM Narendra Modi On Arvind Kejriwal
PM Narendra Modi On Arvind Kejriwal
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर PM मोदींनी केजरीवालांवर केली टीका

point

"ज्यांना दिल्लीचं मालक व्हायचा घमंड होता, त्यांचा..."

point

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

PM Narendra Modi Speech : दिल्लीला आपदापासून मुक्त करण्याचं काम तुम्ही केलं आहे. मी दिल्लीतील प्रत्येक रहिवाशाला एक पत्र पाठवलं होतं. तुम्ही सर्वांनी प्रत्येक कुटुंबात माझं हे पत्र पोहोचवलं होतं. मी दिल्लीला प्रार्थना केली होती की, 21 व्या शतकात भाजपला सेवेची संधी द्या. दिल्लीला विकसित भारताची विकसित राजधानी बनवण्यासाठी भाजपला संधी द्या. मोदींच्या गॅरंटीवर विश्वास ठेवला म्हणून मी दिल्लीतील प्रत्येक कुटुंबाला माथा टेकून नमस्कार करतो. दिल्लीच्या लोकांचं हे प्रेम, विश्वास आम्हा सर्वांवर एक कर्ज आहे. हे कर्ज दिल्लीचं डबल इंजिन सरकार दिल्लीचा डबल विकास करून वेगाने फेडेल. दिल्लीचा हा ऐतिहासिक विजय आहे. दिल्लीच्या लोकांनी आपदाला बाहेर केलं. एक दशकांच्या आपदापासून दिल्ली मुक्त झाली आहे. आज दिल्लीत विकास, विश्वासाचा विजय झाला आहे, असं मोठं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजपच्या मुख्यालयात केलं. दिल्ली विभानसभा निवडणुकीत भाजपने 48 जागा जिंकल्या असून आम आदमी पार्टीला फक्त 22 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर काँग्रेसला खातंही उघडता आलं नाही.

"ज्यांना दिल्लीचं मालक व्हायचा घमंड होता, त्यांचा सत्यासोबत सामना झाला. राजकारणात शॉर्टकट आणि खोट्या गोष्टींसाठी कोणतीच जागा नाही. जनतेनं शॉर्टकट राजकारणाचं शॉर्ट सर्किट केलं", असं म्हणत नरेंद्र मोदींनी अरविंद केजरीवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. दिल्लीच्या लोकांनी लोकसभा निवडणुकीत मला कधीही नाराज केलं नाही. 2014,2019 आणि 2024 या तिन्ही निवडणुकांमध्ये दिल्लीच्या लोकांनी भाजपच्या सातच्या सात जागांवर भव्य विजय मिळवून दिलं. दिल्लीची युवापिढी आता पहिल्यांदा दिल्लीत भाजपाचं सुशासन पाहणार आहे.

हे ही वाचा >> 'उद्धव ठाकरेंना अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता का?', पुण्यात CM फडणवीसांनी सांगितली A to Z स्टोरी

"आजचं निकाल स्पष्ट करतंय की, भाजपच्या डबल इंजिन सरकारवर देशात किती विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर आम्ही हरियाणात अभूतपूर्व रेकॉर्ड केला. त्यानंतर महाराष्ट्रात नवीन रेकॉर्ड बनवलं. आता दिल्ली नवीन इतिहास रचला आहे. आपलं दिल्ली शहर नाही, तर दिल्ली मिनि हिंदूस्थान आहे. हे लघू भारत आहे. दिल्ली एक भारत श्रेष्ठ भारताच्या विचाराने जगते. दिल्लीत दक्षिण भारत, दिल्लीत पश्चिम भारत आणि दिल्लीत पूर्व भारताचे लोकही आहेत. याच विविधता असलेल्या दिल्लीने भारताला प्रचंड बहुमताचं आशीर्वाद दिलंय. दिल्लीत असा कोणता विभाग नसेल जिथे कमळ फुलला नसेल", असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

हे ही वाचा >> Big Breaking: अरविंद केजरीवालांचा दारूण पराभव, विजय मिळवणारा 'तो' जायंट किलर कोण?

हे वाचलं का?

    follow whatsapp