Big Breaking: अरविंद केजरीवालांचा दारूण पराभव, विजय मिळवणारा 'तो' जायंट किलर कोण?
Delhi Seat Election Results 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना दारुण पराभव पत्करावा लागला आहे. भाजपच्या प्रवेश वर्मा यांनी त्यांना मोठा धक्का देत पराभव केला आहे.
ADVERTISEMENT

Delhi Seat Election Results 2025: नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीतील 70 विधानसभा जागांसाठी मतमोजणी पार पडली आहे. पण सर्वांच्या नजरा नवी दिल्ली विधानसभेच्या जागेवर होत्या आणि निकाल आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण या जागेवर आपकडून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेसकडून संदीप दीक्षित आणि भाजपकडून प्रवेश वर्मा निवडणूक रिंगणात होते.
देशातील सर्वात चर्चेत असलेल्या मतदारसंघात म्हणजेच नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात मोठा उलटफेर झाला. येथे आप पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मोठा पराभव पत्करावा लागला आहे. भाजपच्या प्रवेश वर्मा यांनी त्यांना धक्का देत पराभव केला आहे. प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा सुमारे 4 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.
हे ही वाचा>> Delhi Election Result: 'लढा अजून आपआपल्यात...', कोणी साधला काँग्रेस-आपवर निशाणा?
अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तर, प्रवेश वर्मा यांचे वडील साहिब सिंग वर्मा हे दिल्लीचे मुख्यमंत्री होते, तर संदीप दीक्षित हे दिल्लीच्या सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित यांचे पुत्र आहेत. दिल्लीच्या नवी दिल्ली मतदारसंघातून जिंकणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपद मिळते असे मानले जाते.
भाजपने यंदाच्या निवडणुकीत जबरदस्त कामगिरी करत थेट 48 जागांवर विजय मिळवला आहे. तर आपला 22 जागांवरच समाधान मानावं लागलं.










