Bhaubeej 2024 : 02 की 03 नोव्हेंबर, भाऊबीज कधी आहे? जाणून घ्या योग्य तारीख
Bhaubeej 2024 Importance: भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर भाऊ बहीण आपल्या भावाला ओवाळते, भावाच्या निरोगी आयुष्यासाठी सदिच्छा देते. तर भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी देऊन आपलं प्रेम व्यक्त करतो.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
02 की 03 नोव्हेंबर, भाऊबीज कधी आहे?
यंजा भाऊबीज कधी साजरी केली जाणार?
भाऊबीज नेमकी का साजरी केली जाते?
Bhaubeej 2024 Date and Importance : दिवाळी हा हिंदू धर्मातला मोठा आणि महत्वाचा सण. दिवाळीत वेगवेगळे पवित्र मुहूर्त असतात, ज्यापैकी एक म्हणजे भाऊबीजेचा सण. भाऊ बहिणीं प्रेमाचं प्रतिक असलेल्या या सणाची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात. मराठी महिन्यांप्रमाणे कार्तिक महिन्याकील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला भाऊबीज हा सण साजरा केला जातो. भावाबद्दल असलेलं प्रेम व्यक्त करण्याचा हा सण मोठा आनंद देणारा असतो. या शुभ मुहूर्तावर भाऊ बहीण आपल्या भावाला ओवाळते, भावाच्या निरोगी आयुष्यासाठी सदिच्छा देते. तर भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी देऊन आपलं प्रेम व्यक्त करतो. भाऊ आपल्या बहिणीला यावेळी रक्षण करण्याचं वचणही देतो. भाऊबीजेच्याच दिवशी यम द्वितीयाही साजरी होत असते. या वर्षी भाऊबीजेचा सण हा 3 नोव्हेंबरला असणार आहे. (Bhaubeej Muhurta 2024 Diwali pooja)
भाऊबीज कधी साजरी होणार?
हे ही वाचा >>Gold Price Today : सोन्याला आली झळाळी, चांदीची चमकही प्रचंड वाढली! ऐन दिवाळीत खिशाला बसणार मोठा फटका |Shiv Sena UBT|
तिथीनुसार दरवर्षी भाऊबीजेच्या मुहूर्ताची वेळ बदलत असते. यावर्षी 2 नोव्हेंबररोजी रात्री साडे आठ वाजता कार्तिक महिन्याची द्वितीया तिथी सुरू होते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अर्थातच 3 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता समाप्त होते. त्यामुळे यावर्षी उदय तिथीनुसार 3 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी केली जाणार आहे.
भाऊबीजेचा शुभ मुहूर्त कोणता?
हे ही वाचा >>Bollywood Actress: भारताची सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण? 4600 कोटींचं नेटवर्थ, नाव वाचून थक्कच व्हाल
यावर्षी 3 नोव्हेंबरला सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत सौभाग्य योग असणार आहे. त्यामुळे सकाळी पावणेबारा वाजेची वेळ ही पूजेसाठी सर्वोत्तम वेळ असणार आहे. तसंच सकाळी 4:51 ते 5:43 वाजेपर्यंत ब्रम्ह मुहूर्त असणार आहे. त्यानंतर दुपारी 1:54 ते 2:38 वाजेपर्यंत विजय मुहूर्त असणार आहे. तर संध्याकाळी 5:34 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत गोधूली मुहूर्त असणार आहे. त्यामुळे या मुहूर्तांमध्ये भाऊबीज पूजा करण्याला जास्तीत जास्त लोकांचं प्राधान्य असणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT