Bollywood Actress: भारताची सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण? 4600 कोटींचं नेटवर्थ, नाव वाचून थक्कच व्हाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Bollywood Richest Actress
Who Is The Richest Actress In India
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारताच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रीचं नेटवर्थ किती?

point

'ती' अभिनेत्री शाहरुख, सलमान आणि आमिर खानसोबत सिनेमांमध्ये झळकलीय

point

नेटवर्थमध्ये 'या' अभिनेत्रींना टाकलं मागे

Richest Actress In India : 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी पदार्पण केलं. पण यामध्ये काही अभिनेत्री अशा आहेत, ज्यांचा रुबाब आजही कायम आहे. आताच्या जमान्यात प्रियांका चोप्रा, दिपिका पादुकोण, आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफने सिनेमांच्या माध्यमातून छाप टाकली आहे. हाईएस्ट पेड अॅक्ट्रेसच्या लिस्टमध्ये याच अभिनेत्रींचा समावेश आहे. पण बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्ये 90 च्या दशकातील एका सुंदर अभिनेत्रीच्या नावाचा समावेश आहे. त्या अभिनेत्रीनं सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खानसोबत काम केलं आहे. 

ADVERTISEMENT

भारताची सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण?

सलमान, शाहरुख आणि आमिर या तिन्ही सुपरस्टार अभिनेत्यांसोबत सुपरहिट सिनेमा देणाऱ्या या अभिनेत्रीने मागील 10 वर्षांपासून एकही हीट सिनेमा केला नाही. ही अभिनेत्री गतवर्षी प्रदर्शित झालेल्या एका सिनेमात झळकली होती. शाहरूख खानसोबत केकेआर टीमची को-ओनर असलेल्या या अभिनेत्रीचं नाव आहे जुही चावला.

हे ही वाचा >>  Mazi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! पुन्हा कधी मिळणार 1500 रुपये? 'ही' माहिती एकदा वाचा

हुरुन इंडियाने वर्ष 2024 ची रिचेस्ट अॅक्ट्रेसची लिस्ट जारी केली आहे. जुही चावला भारताची सर्वात श्रीमंत अभिनेत्री म्हणून प्रकाशझोतात आली आहे. हुरुनच्या रिपोर्टनुसार, जुही चावलाची नेटवर्थ 4600 कोटी रुपये आहे. तर या लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावर ऐश्वर्या रायच्या नावाची नोंद आहे. ऐश्वर्याचं एकूण नेटवर्थ 850 कोटी रुपये आहे.

हे वाचलं का?

जुही चावलाने या अभिनेत्रींना टाकलं मागे

हुरून इंडिया रिच अॅक्ट्रेस लिस्ट 2024 मध्ये जुही चावलाने प्रियंका चोप्रा (650 कोटी नेटवर्थ) आणि आलिया भट, दीपिका पादुकोणलाही मागे टाकलं आहे.  जुही चावलाने सिनेमांपेक्षा जास्त पैसे तिच्या व्यवसायातून कमावले आहेत. जुही आयपीएलशिवाय शाहरुख खान-गौरी खानचं फिल्म प्रोडक्शन हाऊस रेड चिलीजमध्ये पैशांची गुंतवणूक करते. जुहीचे पती जय मेहता स्वत: एक उद्योगपती आहेत. त्यांच्यासोबत जुहीने रिअल इस्टेटमध्ये पैशांची गुंतवणूक केली आहे. 

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: महिलांनो! लाडकी बहीण योजना बंद होणार? निवडणुकीआधी समोर आली सर्वात मोठी अपडेट

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT