C295 Plane : भारतीय वायूदलाची ताकद आणखी वाढली! कारण…

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Indian Air Force : C295 Plane : युरोपियन कंपनी एअरबस डिफेन्स अँड स्पेस (AD Space) ने बुधवारी (13 सप्टेंबर) भारतीय वायूदलाला (IAF) 56 C295 पैकी पहिलं विमान सोपवलं आहे. जुन्या एवरो-748 ऐवजी नवीन विमाने आणण्याची तयारी सुरू आहे. एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांना स्पेनमधील सेव्हिल येथे विमान सोपवण्यात आलं. विशेषत: भरतलाला स्पेनमधून 16 C295 विमाने मिळतील आणि उर्वरित 40 विमानांची निर्मिती गुजरातमधील बडोदा येथे केली जाईल. (C295 Plane has increased the strength of the Indian Air Force)

ADVERTISEMENT

बडोदामध्ये टाटा अॅडव्हान्स सिस्टम कंपनी त्याची निर्मिती करेल. 25 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील हिंडन एअरबेस येथे ते लँड करण्याची शक्यता आहे. भारताने हा करार 21 हजार कोटी रुपयांत केला होता. करारानुसार 4 वर्षात 16 विमान देण्यात येणार आहेत.

वाचा : Bademiya: हे काय… मुंबईतील प्रसिद्ध ‘बडेमिया’च्या किचनमध्ये उंदीर-झुरळं, FDA ही अवाक्

ऑर्डरवर असलेल्या 56 विमानांपैकी, पहिले 16 C295 विमान सेव्हिलेमधील सॅन पाब्लो सुर साइटवर असेंबल केले जाईल, दुसरे विमान 2024 मध्ये पाठवले जाईल आणि पुढील 14 C295 विमान ऑगस्ट 2025 पर्यंत दर महिन्याला पाठवले जातील. यासाठी एअरबस आणि टाटाच्या हैदराबाद आणि नागपूर प्लांटमध्ये 14,000 हून अधिक स्वदेशी भाग तयार केले जातील आणि ते बडोदा येथे पाठवले जातील. सध्या, एअरक्रू एव्हिएटर्सची पहिली तुकडी उड्डाणासाठी प्रशिक्षण घेत आहे. दुसऱ्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. वायुसेना प्रमुख म्हणाले की, ‘भारतीय वायुसेनेसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे देशाची क्षमता वाढेल. दुसरं म्हणजे स्वावलंबी भारताची ओळख बनेल. येथून एक नवं युग सुरू होत आहे.’

हे वाचलं का?

वाचा : Maratha Reservation : ‘मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नका’, नारायण राणेंचे धक्कादायक विधान

C295 विमानाचं वैशिष्ट्य काय?

हे विमान शॉर्ट टेक ऑफ आणि लँडिंगमध्ये माहिर आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे विमान केवळ 320 मीटर अंतरावर टेक-ऑफ करू शकते. त्याच वेळी, लँडिंगसाठी 670 मीटर लांबी पुरेसे आहे. लडाख, काश्मीर, आसाम आणि सिक्कीम सारख्या भागात ऑपरेशन दरम्यान ते अतिशय योग्य असल्याचं म्हटलं जातं.

हे विमान 11 तास सतत उड्डाण करू शकते. दोन लोक यात जाऊ शकतात. क्रू केबिनमध्ये टचस्क्रीन नियंत्रणासह स्मार्ट कंट्रोल सिस्टम देखील आहे. हे विमान 7,050 किलो वजनाचे पेलोड वाहून नेऊ शकते आणि एकावेळी 71 सैनिक, 44 पॅराट्रूपर्स, 24 स्ट्रेचर किंवा 5 कार्गो पॅलेट वाहून नेऊ शकते. त्याची लांबी, 80.3 फूट आणि उंची 28.5 फूट आहे. ते 7650 लिटर इंधन ठेवू शकते. विशेष बाब म्हणजे ते हवाई ते सागरी वातावरणापर्यंतच्या वातावरणात रात्रंदिवस लढाऊ ऑपरेशन करू शकते.

ADVERTISEMENT

वाचा : Viral News : ‘नवरा हवाय’, रस्त्यावर बोर्ड झळकावताच तरूणीसोबत…

यात लोडिंग आणि ड्रॉपशिपची कोणतीही समस्या नाही. याच्या मागील बाजूस रॅम्प दरवाजा आहे, जो सैनिक किंवा मालाची जलद वाहतूक करण्यास मदत करेल. विमान 2 Pratt & Whitney PW127 Turbotroop इंजिनने सुसज्ज आहे. सर्व विमानांमध्ये स्वदेशी बनावटीचे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट असतील.

ADVERTISEMENT

सैन्यासाठी का आहे आवश्यक?

वायूदलाकडे 60 वर्षांपूर्वी खरेदी केलेली 56 Avro वाहतूक विमाने आहेत, त्यापैकी बरीच जुनी आहेत. ते बदलण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. 2013 मध्ये, रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (RFP) कंपन्यांना पाठवले होते. 2015 मध्ये, संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC) टाटा समूह आणि एअरबसच्या C295 विमानांच्या टेंडर मंजूर केले होते. 40 विमानांच्या निर्मितीसोबतच देशात 15 हजार नोकऱ्या निर्माण होतील, असा दावा केला जात आहे. त्यामुळे 10 हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT