काळजी घ्या.. फक्त कफ सिरपच नाही, तर 'ही' औषधं देणंही ठरतील मुलांसाठी जीवघेणी!

मुंबई तक

Cough syrup News : फक्त कफ सिरपचं नाही, जबाबदारीने न दिल्यास 'ही' दोन औषधंही लहान मुलांचा जीव घेऊ शकतात!

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जबाबदारीने न दिल्यास 'ही' दोन औषधंही लहान मुलांचा जीव घेऊ शकतात!

point

कफ सिरपमुळे काही दिवसांपूर्वी अनेक लहान मुलांना जीव गमवावा लागलाय

Cough syrup News : राजस्थान आणि मध्य प्रदेशात कफ सिरप पिल्यामुळे अनेक मुलांच्या मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देशात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खोकला-थंडी झाल्यावर पालक बहुतेक वेळा डॉक्टरांचा सल्ला न घेता मुलांना कफ सिरप देतात, परंतु ज्या पद्धतीने कफ सिरप मुलांसाठी घातक ठरत आहे, त्यामुळे ही सवय जीवघेणी ठरू शकते का, असा विचार आता सर्वजण करू लागले आहेत. अलीकडील घटनांनंतर लोकांमध्ये मत तयार होत आहे की मुलांना कफ सिरप देऊ नये. पण फक्त कफ सिरपच नव्हे, तर आणखी काही औषधे आहेत जी डॉक्टरांच्या सल्ल्याविना मुलांना देणे धोकादायक ठरू शकते.

याचे कारण म्हणजे मोठ्यांच्या आणि मुलांच्या शरीरात औषधांचा परिणाम आणि रिअ‍ॅक्शन वेगळी असते. जे औषध प्रौढांसाठी फायदेशीर असते, तेच औषध मुलांसाठी नुकसानकारक ठरू शकते. मुलांमध्ये औषधांचे साइड इफेक्ट्स प्रौढांच्या तुलनेत अधिक गंभीर होऊ शकतात. त्यामुळे कोणतेही औषध देण्यापूर्वी, विशेषतः पहिल्यांदाच औषध देताना नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अगदी नैसर्गिक किंवा हर्बल औषधे असली तरीही.

आपण काही अशा औषधांविषयी जाणून घेणार आहोत, जी मुलांसाठी घातक ठरु शकतात. या औषधांसाठी प्रौढ आणि मुलांसाठी वेगळ्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब केला जातो. मुलांना दूर ठेवायच्या औषधांमध्ये अ‍ॅस्पिरिन (Aspirin) आणि अँटिबायोटिक्स (Antibiotics) यांचा विशेष समावेश आहे.

अ‍ॅस्पिरिन का देऊ नये?

डोकेदुखी, दातदुखी, आणि मासिक पाळीच्या वेदनांसाठी अ‍ॅस्पिरिनचा वापर केला जातो. सर्दी, फ्लू आणि तापासाठीही काही लोक हे औषध घेतात. अ‍ॅस्पिरिनला अ‍ॅसिटाइलसॅलिसिलिक अ‍ॅसिड या नावानेही ओळखले जाते. 12 वर्षांखालील मुलांना अ‍ॅस्पिरिन दिल्यास रेय सिंड्रोम नावाचा गंभीर आजार होऊ शकतो, जो यकृत आणि मेंदूला हानी पोहोचवतो.

हे वाचलं का?

    follow whatsapp