Ladka Bhau Yojana: तुम्ही 'या' निकषात बसता का? तर मिळणार 10 हजार रुपये!
Ladka Bhau Yojana Eligibility Criteria: माझा लाडका भाऊ या योजनेसाठी काही पात्रता निकष हे निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे जे तरुण हे पात्रता निकष पूर्ण करू शकतील त्यांनाच या योजनेतून पैसे मिळू शकतील.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
माझा लाडका भाऊ योजनेसाठी काय आहेत निकषय़
कोणते पात्रता निकष पूर्ण करण्याऱ्या तरुणांना मिळणार सरकारकडून पैसे?
जाणून घ्या पात्रता निकषांविषयी सविस्तर
Maza Ladka Bhau Yojana 2024 Eligibility Criteria: मुंबई: महाराष्ट्रातील तरुणांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार मिळावा यासाठी शिंदे सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही नवीन योजना जाहीर केली आहे. जी आता ‘माझा लाडका भाऊ योजना’ (Maza Ladka Bhau Yojana 2024 ) म्हणूनच ओळखली जात आहे. पण या योजनेत सरकार तरुणांना केवळ प्रशिक्षणच देणार नाही तर त्यासोबत दरमहा 10 हजार रुपयांपर्यंत पैसेही देणार आहे. (eligibility criteria for maza ladka bhau yojana 2024 know what the age and education requirements are)
ADVERTISEMENT
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांना अर्ज करताना काही पात्रता निकष लक्षात ठेवावे लागतील. त्या पात्रता निकषांमध्ये जे तरुण बसतील त्यांनाच याचा फायदा होणार आहे.
हे ही वाचा>> Maza Ladka Bhau Yojana Apply: लाडका भाऊ योजनेसाठी 'असा' भरा अर्ज अन् मिळवा 10 हजार रुपये!
योजनेचे नाव |
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (Maza Ladka Bhau Yojana) हे वाचलं का? |
कोणी सुरू केली |
शिंदे सरकार (महाराष्ट्र शासन) |
लाभार्थी |
राज्यातील युवक ADVERTISEMENT |
उद्देश |
युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे ADVERTISEMENT |
आर्थिक सहाय्य |
10,000 रुपयांपर्यंत प्रति महिना |
राज्य |
महाराष्ट्र |
अर्ज प्रक्रिया |
ऑफलाइन, ऑनलाइन |
अधिकृत वेबसाइट |
अद्याप सुरू झालेली नाही |
Maza Ladka Bhau Yojana 2024 साठी पात्रता निकष
- तुम्ही मूळचे महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
- या योजनेचा लाभ 18 ते 35 वयोगटातील तरुणांच घेता येणार आहे.
- बारावी पास, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन अशी शिक्षणाची पात्रता असल्यास बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा लाभ मिळेल.
- शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत.
- यासाठी तुमचे बँक खाते आधारशी लिंक असणं गरजेचं आहे.
- जर तुम्ही महाराष्ट्रातील तरुण आणि विद्यार्थी असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
- उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
हे ही वाचा>> Ladka Bhau Yojana Documents : 'ही' पाच कागदपत्रे हवीच, नाहीतर अर्ज होईल बाद!
माझा लाडका भाऊ योजना 2024 साठी आवश्यक कागदपत्रे
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रं असणं अनिवार्य आहे.
- आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- वय प्रमाणपत्र
- चालक परवाना
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- मोबाइल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- बँक खाते पासबुक
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT