पोटावरची चरबी झटपट होईल गायब, फक्त ‘याचा’ करा वापर
पोटावर आणि कंबरेवर चरबी वाढत गेली की, त्याचा पहिला परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वार दिसून येतो, त्यानंतर त्याचा विपरित परिणाम हळूहळू तुमच्या शरीरावर जाणवू लागतो. त्यामुळे लठ्ठपणा आणि चरबी कमी करण्यासाठी अद्रकचा वापर केला तर मात्र त्याचा चांगला परिणाम तुम्हाला दिसून येतो.
ADVERTISEMENT
Ginger Remedies To Lose Weight Naturally: सध्याच्या काळात अनेक लोकांना लठ्ठपणा ही त्यांच्यासाठी मोठी समस्या बनली आहे. शरीराचा लठ्ठपणा (obesity) जर प्रमाणाच्या बाहेर वाढत गेला तर त्याचा पहिला परिणाम हा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर पडतो. त्यानंतर आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम दिसू लागतो आणि तिच एक मोठी समस्या बनू लागते. लठ्ठपणा वाढत गेला की, तो पहिल्यांदा तुमच्या कंबरेवर आणि पोटाभोवती दिसू लागतो. लठ्ठपणा गतीने वाढत असला तरी तो कमी होताना मात्र गतीने कमी होत नाही.पोटाभोवती वाढणारी चरबी ही कमी करण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय शोधत असाल तर तुमच्या किचनरुममध्ये असलेले आले तुमच्यासाठी मोठे फायदेशीर असणार आहे.
ADVERTISEMENT
लठ्ठपणापासून होईल सुटका
किचनरुममध्ये असलेले आले हे जास्त करून चहा बनवण्यासाठीच वापरले जाते. मात्र त्याचबरोबर जेवणाची टेस्ट वाढवण्यासाठीही त्याचा फायदा होतो. मात्र त्या फायद्याबरोबरच अद्रकचा आणखी एक महत्वाचा फायदा आहे तो तुम्हाला माहिती आहे का ? तुमचा लठ्ठपणा वाढत असेल तर त्यापासून सुटका करण्याचे महत्वाचे काम अद्रक करत असते. त्याचेच फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
उन्हाळ्यामध्ये काळजी घ्या
वाढलेले वजन कमी करण्यासाठी, लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्याबरोबरच पचन सुधारण्यासाठी अद्रकचा फायदा होत असतो. त्यामध्ये असणारे अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट हे गुणधर्म फायदेशीर असते. संशोधनानुसार हे सिद्ध झाले आहे की, लठ्ठपणा वाढत गेला तर कोणत्याही व्यक्तीला ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो. आल्यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्मामुळे शरीरातील रॅडिकल्स नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे लठ्ठपणाही कमी होतो. अद्रकचा फायदा होत असला तरी उन्हाळ्यामध्ये मात्र विशेष काळजी घेतली पाहिजे कारण उन्हाळ्याच्या दिवसात 3-4 ग्रॅमपेक्षा अद्रकचा वापर करता कामा नये.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> शिंदेंनी ‘तो’ मुद्दा छेडला, जितेंद्र आव्हाड भडकले; म्हणाले, “असे कृत्य घडू नये”
आल्यासोबतच लिंबाचा रस
वजन कमी करण्याबरोबरच चयापचय वाढवण्यासाठी लिंबाच्या रसाबरोबर अद्रकचेही सेवन करा. अद्रकाचा वापर आहारामध्ये वाढत गेला तर त्यामुळे भूक कमी होऊन लठ्ठपणाही कमी होतो. त्यासाठी अद्रकचे लहान लहान तुकडे करून घ्या आणि पाणी उकळून ते गाळून घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस घालून ते दिवसातून दोन ते तीन वेळा घेतल्यास त्याचा वजन कमी करण्यासाठी फायदा होतो.
चवीसाठी लिंबू-मध घ्या
तुमचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्ही अद्रकच्या रसाचे काही थेंब पाण्यात टाकून घेतल्यासही त्याचा चांगला परिणाम दिसू लागतो. त्याचबरोबर पाण्यात मिसळलेला हा रस तुम्ही दिवसातून एक दोन वेळा घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला वाटत असेल तर पाण्यात लिंबू आणि मधाचे काही थेंब टाकून तेही तुम्ही घेऊ शकता.
ADVERTISEMENT
अद्रकचा चहा
वजन कमी करण्यासाठी अद्रकाबरोबरच सफरचंद सायडर व्हिनेगरचा वापर केल्यामुळेही वजन कमी होण्यासाठी त्याची मदत होते. गरम पाण्यात टी बॅगचा वापर करून अद्रकचा चहा करू शकता, वर व्हिनेगरचा वापर करण्यापूर्वी ते थंड होऊ देणे महत्वाचे असते. व्हिनेगरमध्ये गरम पाण्याचा वापर केला तर त्यातील बॅक्टेरिया संपुष्टात येतात, त्यामुळे त्याचा परिणाम कमी दिसून येतो.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Lok Sabha : महायुतीचे जागा वाटप कधी? शिंदेंच्या मंत्र्याने दिली महत्वाची माहिती
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT