Maza Ladka Bhau Yojana: लाडका भाऊ योजनेत फक्त 6 महिनेच मिळणार पैसे, असा नियम का?

मुंबई तक

Maza Ladka Bhau Yojana Rules: माझा लाडका भाऊ योजनेतील तरुणांना राज्य सरकार केवळ सहा महिनेच पैसे देणार आहे. जाणून घ्या या योजनेतील नेमक्या अटी आणि नियम काय आहेत.

ADVERTISEMENT

लाडका भाऊ योजनेत फक्त 6 महिनेच मिळणार पैसे
लाडका भाऊ योजनेत फक्त 6 महिनेच मिळणार पैसे
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडका भाऊ योजनेत मिळणार फक्त 6 महिने पैसे

point

लाडका भाऊ योजनेतील अटी आणि नियम काय?

point

लाडका भाऊ योजना नेमकी कोणासाठी?

Maza Ladka Bhau Yojana Money: मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेप्रमाणेच लाडक्या भावांसाठी त्यांच्या सरकारने योजना सुरू केल्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेलाच मुख्यमंत्री शिंदेंनी माझा लाडका भाऊ योजना (Maza Ladka Bhau Yojana) असल्याचं म्हटलं आणि तेव्हापासूनच या योजनेबाबत बरीच चर्चा सुरू झाली. पण खरं म्हणजे ही योजना माझी लाडकी बहीण योजनेसारखी अजिबात नाही. यामध्ये तरुणांना जे पैसे मिळणार आहेत ते केवळ 6 महिन्यांसाठी मिळणार आहेत. (in maza ladka bhau yojana youth will get money only for 6 months why has the shinde government made such a rule)

माझी लाडकी बहीण योजना ही सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे. ज्यामध्ये महिलांना 1500 रुपये दरमहा मिळणार आहेत. त्यामुळे या योजनेबाबत महिलांमध्ये बरीच उत्सुकता आहे. या योजनेमध्ये पात्र ठरणाऱ्या महिलांना कायम स्वरुपी पैसे मिळणार आहेत. ज्याचा त्यांना थेट फायदा होणार आहे. 

या योजनेची लोकप्रियता लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेला लाडका भाऊ योजना म्हणत ती तरुणांसाठी आणत असल्याचं जाहीर केलं.

हे ही वाचा>> Ladka Bhau Yojana GR: लाडका भाऊ योजनेचा जीआर लागू, पाहा तरुणांना नेमके कसे मिळणार पैसे?

मात्र, असं असलं तरीही लाडका भाऊ या योजनेतून तरुणांना जे आर्थिक सहाय्य मिळणार आहे ते केवळ 6 महिन्यांसाठीच असणार आहे. तसंच जे तरुण कौशल्य प्रशिक्षण घेण्यासाठी कंपनी किंवा कार्यलयांमध्ये जातील त्यांनाच हे पैसे मिळतील. अन्यथा त्यांना कोणतेही पैसे मिळणार नाहीत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp