INDIA@100: भारत, महासत्ता अन्… आकाशात झेप घेण्याची वेळ!
INDIA@100: भारताला खरी लष्करी महासत्ता म्हणून प्रस्थापित करण्यासाठी तीन महत्त्वाची क्षेत्रे आहेत. पण या क्षेत्रात नेमकी कशी प्रगती साधायची यासाठी वाचा हा विशेष लेख.
ADVERTISEMENT

INDIA@100: प्रदीप आर. सागर: संरक्षण सामग्रीच्या खरेदीसाठी अनेक मोठे सौदे निःसंशयपणे चर्चेत असतात, परंतु मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत भारतीय संरक्षण उद्योगाला स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने सरकारने उचललेली पावले काही कमी उल्लेखनीय नाहीत. स्वदेशी तेजस LCA MK-2 साठी जेट इंजिनची निर्मिती, वेगाने वाढणारा भारतीय ड्रोन उद्योग आणि देशाच्या सायबर सुरक्षेसाठी केलेले कार्य, ही तीन महत्त्वाची क्षेत्रे आहेत ज्यात महत्त्वपूर्ण नवनवीन शोध असतील. भारताला खरी लष्करी महासत्ता म्हणून प्रस्थापित करण्यात ते मोठी भूमिका बजावतील. (india at 100 india defense aviation wing whose history and future will dazzle the eyes when it completes 100 years of independence)
इंजिनांमुळे बदलतील अनेक गोष्टी
F414 जेट इंजिनच्या निर्मितीसाठी तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणासाठी अमेरिकेसोबत करार करण्यात आला आहे. यामुळे भारताला भविष्यात स्वत:ची हाय-टेक इंजिन तयार करण्याची महत्त्वपूर्ण तांत्रिक क्षमता संपादन करण्यात मदत होईल.
या विमानांचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचे इंजिन असतं जे बनविण्यात आपण आजपर्यंत सक्षम झालेलो नाहीत. स्वदेशी लढाऊ विमानांच्या विकासाच्या मार्गातील हा सर्वात मोठा अडथळा ठरला आहे. फक्त या तथ्यांकडे लक्ष द्या: जगात सुमारे 40 विमान उत्पादक आहेत. परंतु लष्करी विमान इंजिनची संपूर्ण रचना, विकास आणि निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान फक्त चार देशांकडे आहे: अमेरिका, युके, रशिया आणि फ्रान्स. चीनने आपले जेट इंजिन विकसित करण्यासाठी 2 अब्ज डॉलरपेक्षा जास्त खर्च केले आहेत, तरीही ते लढाऊ विमानांच्या इंजिनसाठी रशियाकडून आयातीवर अवलंबून आहेत. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) चे स्वदेशी बनावटीचे कावेरी इंजिन लढाऊ विमानांना पुरेशी उर्जा पुरवण्याचे निकष पूर्ण करू शकलेले नाही.
त्यामुळे भारताच्या लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) बांधणी कार्यक्रमाला विलंब झाला. GE F404 इंजिन सध्या LCA तेजसमध्ये वापरले जात आहेत. तेजसची निर्मिती करणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) अमेरिकन कंपनी जीई एरोस्पेसकडून खरेदी करार केल्यानंतर ते विकत घेतले. अनेक वर्षांच्या वाटाघाटीनंतर, अधिक शक्तिशाली GE F414 इंजिनच्या संयुक्त उत्पादनासाठी अमेरिकेने आपले 80 टक्के जेट इंजिन तंत्रज्ञान भारताकडे हस्तांतरित करण्याचे मान्य केले आहे. नवीन GE F414 इंजिन HAL च्या LCA तेजस MK-II फायटर जेटला उर्जा देईल.